शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका नॉट रिचेबल; ऑफलाईन अहवालाचा ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST

पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजीत असल्याने अंगणवाडी सेविकांना त्यावर कामकाज करणे अडचणीचे जात आहे. त्यामुळेच अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने मोबाईल परत ...

पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजीत असल्याने अंगणवाडी सेविकांना त्यावर कामकाज करणे अडचणीचे जात आहे. त्यामुळेच अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने मोबाईल परत करण्याचे सत्र सुरू ठेवली आहे.आतापर्यंत ६० ते ६५ टक्के अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये २४०८ अंगणवाड्या आहेत. त्या अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून तीन हजार पाचशे जणी काम करतात. अंगणवाडी सेविकांना दिलेल्या पोषण अहवालात स्तनदा माता, गरोदर माता, बालकांचे वजन, उंची आदी बाबतची माहिती भरून शासनाला द्यावी लागते. मात्र शासनाने दिलेल्या मोबाईलची रॅम कमी आहे. एवढेच नाही तर नवीन ॲप डाऊनलोड होत नाहीत. त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप नावाला झाले आहे. शिवाय,ॲप इंग्रजीत असल्यामुळे अंगणवाडीसेविकांना त्यात माहिती भरणे अडचणीचे ठरत आहे. याच कारणामुळे अनेक अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले आहेत. त्यामुळे या अंगणवाडी सेविकांना आता ऑफलाईन नोंदी ठेवाव्या लागत आहेत.

असून अडचण नसून खोळंबा.....

२०१९ मध्ये मोबाईल दिल्या आहेत. या मोबाईलची रॅम कमी आहे. त्यामुळे ॲप डाऊनलोड करून घेता येत नाहीत. पोषण ट्रॅकरही इंग्रजीत आहे. त्यामुळे मोबाईल असून अडचण नसून खोळंबा आहे. २०१९ मध्ये दिलेले मोबाईल अनेकांचे नादुरुस्त झाले आहेत.त्याच्या दुरुस्तीची तरतूद महिला व बालकल्याण विभागाकडे नाही.त्यापेक्षा पेपर वरच कामकाज चांगले म्हणून आम्ही मोबाइल परत केले असल्याचे अनेक अंगणवाडी सेविकांनी सांगितले. स्थानिक मोबाईल रिपेअर करणाऱ्या दुकानदारांकडेही हे मोबाईल दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे स्वतःच्या मोबाईलवरून काम केलेले बरे,असे काही अंगणवाडी ताई म्हणाल्या.

म्हणून केला मोबाईल परत....

पूर्वी दिलेल्या मोबाईल मध्ये कॅश नावाचे ॲप होते. त्या ॲप मध्ये प्रादेशिक भाषा निवडण्याची सोय होती.

पोषण ट्रॅकर ॲप मध्ये भाषा निवडण्याची सोय नाही. त्यात मराठी करता येत नाही. इंग्रजीत करावे लागते. दुरुस्तीसाठी शासनाकडून पैसे मिळाले नाहीत. मोबाईल खराब झाल्यामुळे परत केलेले आहेत.