यावेळी डॉ.जाधव यांनी बियाणे प्रक्रिया आणि बियाणे बदलामुळे उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते, असे सांगून कडधान्य उत्पादनात जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यात तुरीच्या ७११ वाणांची मदत होईल, असेही ते म्हणाले. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील डॉ.अरुण गुट्टे यांनी ‘ऊस लागवड व एकात्मिक व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले. करमाळा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी ब्रह्मदेव सरडे यांनी ऊस उत्पादकांशी अनुभव कथनातून संवाद साधला. सूत्रसंचालन अंजली गुंजाळ यांनी केले. आभार सतीश बेद्रे यांनी मानले.
जिल्ह्यातील शेतकरी ऊस उत्पादनात मागे नाहीत
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणलो, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ऊस उत्पादनातील फरक मोठा आहे, अशी सतत तुलना केली जाते. मात्र, तेथील १८ महिन्यांचा ऊस आणि आपल्याकडील १२ महिन्यांच्या ऊस उत्पादनात संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा विचार करूनच तुलना मांडली पाहिजे. केवळ टनांची भावनिक तुलना करून फरक काढणे फारसे योग्य होणार नाही. ऊस लागवडीपासून तुटेपर्यंतचे दिवस मोजून उत्पादन काढले पाहिजे. जिल्ह्यातील शेतकरी ऊस उत्पादनात मागे नाहीत, हे सर्वांना समजेल.