२९३ जणांना रुग्णालयातून सुट्टी
प्रकृती ठणठणीत झाल्याने २९३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील १९८, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ५, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील १७, बावची कोविड केअर सेंटरमधील ९, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील एक, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील २, मरशिवणी येथील एक, शिवनेरी कॉलेज शिरूर अनंतपाळ कोविड केअर सेंटरमधील ३ अशा एकूण २९३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
रुग्ण दुपटीचा कालावधी २६८ दिवसांवर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ टक्के झाले असून, रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी २६८ दिवसांवर गेला आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र २.४ टक्के असून, ते चिंताजनक आहे. आरोग्य विभागाकडून हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.