ग्रामीण रुग्णालय उदगीर - १६९९ -
१०१६
ग्रामीण रुग्णालय औसा - १११९
७३५
ग्रामीण रुग्णालय अहमदपूर १०६३
६७५
ग्रामीण रुग्णालय, मुरुड - ९२७
५५२
वि.दे.शा.वै.वि.संस्था - ४९४८
१७१०
एमआयएमएसआर १२५७
१००५
उपजिल्हा रुग्णालय निलंगा १४०४
७५०
ग्रामीण रुग्णालय चाकूर ८३७
५९९
ग्रामीण रुग्णालय जळकोट ४४७
३३८
ग्रामीण रुग्णालय रेणापूर ७२१
४०६
प्रा.आ.केंद्र.शि.अंनतपाळ ४०७
३४८
मांजरा आयुर्वेद महा. १९०३
८३५
प्रभावती हॉस्पीटल १००
१२
एकूण : १७३९४
९३१०
५३.५२ टक्के लसीकरण...
आतापर्यंत खाजगी व सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचा-यांचे ५३.५२ टक्के लसीकरण झाले आहे. उदगीर सामान्य रुग्णालय केंद्रावर ६०.१९, ग्रामीण रुग्णालय मुरुड ५९.९५, अहमदपूर ग्रामीण रुग्णालय ६३.५०, औसा ग्रामीण रुग्णालय ६१.७१, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील केंद्रावर ३४.५६, एमआएमएसआर केंद्रावर ७९.९५, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे ५३.४२, ग्रामीण रुग्णालय चाकूर ७१.५७, ग्रामीण रुग्णालय देवणी ६५.६७, ग्रामीण रुग्णालय जळकोट ५६.३१, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरुर अनंतपाळ ८५.५०, मांजरा आयुर्वेद कॉलेज येथे ४३.३८ आणि प्रभावती हॉस्पिटल केंद्रावर १२ टक्के लसीकरण झाले आहे.
मी स्वत: लस घेतली असून, मला कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे नाेंदणी झालेल्या कर्मचा-यांनी संदेश प्राप्त झाल्यानंतर संबधित केंद्रावर जाऊन लस घ्यावी. - डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक
कोरोना प्रतिबंधासाठी लस आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ३१० जणांनी लस घेतली आहे. त्यात माझाही समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये एकालाही त्रास झालेला नाही. त्यामुळे संदेश आल्यानंतर संबधितांनी तात्काळ आपल्या सुचविलेल्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्यधिकारी.
महसूलच्या ७७० कर्मचा-यांची नाेंदणी
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येत आहे. दुस-या टप्यासाठी कोरोना प्रतिबंधासाठी काम करीत असलेल्या महसूल कर्मचा-यांची नोंदणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ७७० महसूलमधील अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणी लसीसाठी झाली आहे.