शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

लातूर शहरासह केज, धारुर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी या शहरांच्या पाणीपुरवठा मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस ...

लातूर शहरासह केज, धारुर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी या शहरांच्या पाणीपुरवठा मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नव्हता. मात्र, गेल्या चारच दिवसात धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यामुळे ८५ टक्के धरण भरले आहे. यामुळे शहरांना दिलासा मिळाला आहे.

पूर्ण संचय पातळी गाठण्यास ०.८४ मीटर शिल्लक...

धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर आहे. त्यापैकी ६४१.५३ मीटर पाणीपातळी आली आहे. पूर्ण संचय पातळी येण्यासाठी आता फक्त ०.८४ मीटरची गरज आहे. धरणात असाच येवा राहिल्यास दोन दिवसांत धरण शंभर टक्के भरेल अशी शक्यता प्रकल्पावरील शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी व्यक्त केली. पूर्ण धरण भरण्यास १५ टक्के शिल्लक राहिले आहे. ८५ टक्के धरण भरले आहे.

मांजरा कालव्यांतर्गत सिंचनाची सोय...

गेल्यावर्षी जवळपास १०० टक्क्यांच्या आसपास मांजरा प्रकल्प भरला होता. त्यामुळे मांजरा कालवा समितीने उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडले होते. त्यामुळे या कालव्यांतर्गत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. यंदा जर धरण भरले नसते तर शेतकऱ्यांवर ऊस मोडण्याची वेळ आली असती. मात्र, सुदैवाने प्रकल्प क्षेत्रात आणि लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा धरण भरत आले आहे. त्यामुळे या कालव्यातूनही सिंचनासाठी पाणी मिळणार असून, गतवर्षी केलेला ऊस यंदाही राहील, यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.