शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

उदगीरच्या बाजारात तुरीला ७२०० रुपयांचा उच्चांकी दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST

यंदा तुरीचे पिक प्रांरभी चांगले होते. मात्र, फुल आणि फळधरणीच्या काळात अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक भागातील तुरीचे पीक ...

यंदा तुरीचे पिक प्रांरभी चांगले होते. मात्र, फुल आणि फळधरणीच्या काळात अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक भागातील तुरीचे पीक वाळून गेले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उतारा ५० टक्क्यांपेक्षा कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

२०१४ साली होता उच्चांकी दर...

२०१४ मध्ये तुरीला उच्चांकी दर ४ हजार ५०० रुपयांचा मिळाला होता. गेल्यावर्षी मात्र ५ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा दर तुरीला मिळाला. मागील कांही दिवसांपासून तुरीची आवक वाढत आहे. त्याप्रमाणात दरही वाढत आहेत. त्यातच बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील सोयाबीन विक्री केल्याने आवक कमी होत असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.

मागणी पूर्ण करण्यासाठी वाढीव दराने खरेदी...

यंदा व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही. नाफेडने खरेदी केलेली काही तूर लॉकडाऊनच्या काळात विकला आहे. काही स्टॉक त्यांच्याकडेच शिल्लक आहे. बाजारपेठेत तुरीची (डाळवर्गीय धान्याचीही) मागणी वाढलेली आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता वाढीव दराने खरेदी करत आहेत.

शेतमालाच्या दरवाढीची कारणे...

‘नाफेड’कडून तुरीची लॉकडाऊनमध्ये मोठी विक्री व आता विक्री बंद केली आहे. व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्‍ध नाही. बाजारपेठेत तुरीच्या मागणीत वाढ हाेत आहे. तर सध्या बाजारात अत्यल्प आवक सुरु आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने खरेदी

केली जात आहे. तूर न विकलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीचा फायदा होऊ शकतो. हे दर स्थिर राहणार नसून यामध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.

- सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, दालमील असोशिएशन, उदगीर