शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू’चे ६७ टक्के विद्यार्थी जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पहिल्यांदा चार सत्रामध्ये जेईई-मेन्स २०२१ परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल जाहीर झाला आहे. राजर्षी ...

लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पहिल्यांदा चार सत्रामध्ये जेईई-मेन्स २०२१ परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे ६७ टक्के विद्यार्थी जेईई - ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यात ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राजर्षी शाहू महाविद्यालय आणि संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये २२९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १५५ विद्यार्थी जेईई-मेन्स ॲडव्हान्स्ड परीक्षेला पात्र ठरले आहेत. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण ६७ टक्के आहे. ज्यामध्ये ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवणारे १५ विद्यार्थी, ९५पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ४० विद्यार्थी, ९०पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवणारे ६५ विद्यार्थी, ८७पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवणाऱ्या ७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

संस्थेतील तेजस पवन वाकडे या विद्यार्थ्याने ९९.९१ पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. सानिका ज्ञानेश्वर लांडगे या विद्यार्थिनीने ९९.८२ पर्सेंटाईल गुण मिळवून मुलींमध्ये आणि इतर मागास संवर्गातून प्रथम व महाविद्यालयात द्वितीय आली आहे. सृष्टी भगवान जुनघरे या विद्यार्थिनीने ९९.६८ पर्सेंटाईल गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. गजानन सुरेश सापसोडे हा ९९.४४ पर्सेंटाईल गुण मिळवून ईडब्ल्यूएस संवर्गातून प्रथम आला. अनुसूचित जाती संवर्गातून देवश्री प्रकाश देऊळकर हिने ९८.७७ पर्सेंटाईल गुण मिळवले. अनुसूचित जमाती संवर्गातून साईनाथ साहेबराव रेनेवाड याने ९६.८२ पर्सेंटाईल गुण मिळवले.

या यशाबद्दल संस्थाध्यक्ष व माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, गोपाळ शिंदे, सुनील सोनवणे, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य बी. ए. मैंदर्गी, डॉ. सुहास गोरे, प्रा. दिलीप देशमुख, संजय बिरादार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.