शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

३४७५ शिक्षकांनी घेतली नाही लस; मुलांना शाळेत पाठवायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत जि.प.आणि खासगी ...

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत जि.प.आणि खासगी शाळा मिळून ११ हजार ७९० शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. तर जिल्हा परिषदेच्या ४०९ आणि खासगी शाळांच्या ३ हजार ६६ शिक्षकांनी अद्यापही लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे कसे असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात जि.प.च्या १२६९ शाळा असून, त्यामध्ये ५ हजार २७८ तर खासगीच्या १ हजार २५८ शाळा असून, यामध्ये १२ हजार ५१४ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी जि.प.च्या ४ हजार ४६३ तर खासगीच्या ७ हजार ३२६ शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. दरम्यान, ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

लस घेण्याच्या सूचना...

जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शिक्षकांना लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. बहुतांश जणांचे लसीकरण झाले आहे. ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर लस घेऊन सहकार्य करावे. शाळांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

- भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी