शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मांजरा प्रकल्पावरील १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला लागते दोन दलघमी पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 8, 2023 18:06 IST

मान्सून रखडल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यात अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, शिराढोण, मुरुड, येडेश्वरी शुगर, गंगा शुगर, नायगाव, आवाड शिरपुरा, धनेगाव, करजगाव, कोथळा, युसुफवडगाव आणि केज-धारूर बारा गावे पाणीपुरवठा योजना आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांसाठी एकूण दोन दलघमी पाणी महिन्याला लागते. सद्यस्थितीत मान्सूनचा विचार करता, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत २४ % म्हणजे ४२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. मृत पाणीसाठा ४७ % असून, वर्षभराच्या लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले असता, २५ दलघमी लागणार आहे. धरणात ४२ दलघमी पाणीसाठा जिवंत आहे. पुढल्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी पुरवू शकते. परंतु पावसाळा लांबणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मान्सून रखडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा विचार करता पाण्याचे नियोजन धरण प्रशासनाकडून करण्यात आले असून, काटकसरीने वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. आतापर्यंत उन्हाळ्यात तीन रोटेशन झाले आहेत. रोटेशनचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता पिण्यासाठीच उपलब्ध पाणी साठ्याचा वापर होणार आहे.

कोणत्या योजनेला किती लागते महिन्याला पाणी....!लातूर शहराला १.५ दलघमी, अंबाजोगाई ०.३ दलघमी, लातूर एमआयडीसी ३५ दलघमी, केज ०.०५ दलघमी, कळंब १० दलघमी असा एकूण १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला दोन दलघमी पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो.

महिन्याला ७० लाखांची पाणीपट्टी...मांजरा प्रकल्पातून लातूर शहरासह एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी महिन्याला ६० ते ७० लाखांची पाणीपट्टी आकारली जाते. परंतु वसुलीसंबंधित एजन्सीकडून नगण्य आहे. वसुलीला प्रतिसाद नाही. एकट्या लातूर महानगरपालिकेकडे थकबाकी २४ कोटींची आहे. अंबाजोगाई शहराकडे चार आणि लातूर एमआयडीसीकडे चालू थकबाकी सहा कोटींची असल्याचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.

पाणीपट्टी वसुलीला अत्यल्प प्रतिसाद...।पाणीपट्टी वसुलीची मोहीम कडक राबविली जात नसल्यामुळे संबंधित संस्थांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी आहे. मोठ्या गावाकडे लाखोंची थकबाकी आहे. त्यांनी पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अभूतपूर्व पाणी टंचाई लक्षात ठेवा...गतवर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडला होता. एक जूनपासूनच धरणामध्ये नव्याने पाणीसाठा सुरू झाला होता. जुलै महिन्यापासून सर्वाधिक पाणीसाठा होत गेला. यंदा मात्र मान्सून पुढे जाईल, असे संकेत आहेत. त्यामुळे चिंतेचे ढग आहेत. प्राप्त पाणी जपून वापरण्याची गरज आहे. २०१६ सालात लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूर