शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

लातूर विभागाला १०८ कोटींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रवासी सेवा दिली जाते. मात्र, काेराेनाच्या प्रादुर्भावाने या सेवेलाच ग्रहण ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रवासी सेवा दिली जाते. मात्र, काेराेनाच्या प्रादुर्भावाने या सेवेलाच ग्रहण लागले. यातून महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न थांबले आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जगण्याची परवड सुरू झाली. गत ७० वर्षात असे अभूतपूर्व संकट महामंडळ आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाट्याला आले. लातूर विभागात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा असे पाच आगार आहेत. या आगारात जवळपास ४९० बससंख्या आहे. सध्याला टप्प्या-टप्प्याने लांबपल्ल्यासह ग्रामीण भागातील मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्याला अद्यापही ग्रामीण भागातील ५० टक्के ऑपरेशन बंद आहे. एकूण बससंख्येतील १९० बसेस अद्यापही जाग्यावरच थांबून आहेत. काेराेनाच्या संकटाने महामंडळाच्या वाटचालीत अनेक अडथळे निर्माण केले आहेत. लातूर विभागाला दैनंदिन २० लाख रुपयांचा तर महिन्याला ६ काेटींचा फटका सहन करावा लागत आहे. परिणामी, गत मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या १८ महिन्यांच्या काळात एकट्या लातूर विभागाला १०८ काेटींचा ताेटा सहन करावा लागला आहे.

डिझेलचा दर दुप्पटीवर...

जून २०२० मध्ये डिझेल प्रतिलिटर ५६ रुपयांच्या घरात हाेते. आता हेच डिझेल सध्याला ९५ रुपयांवर गेले आहे. त्या तुलनेत मात्र महामंडळाच्या प्रवासी तिकिटात भाडेवाढ झाली नाही. आहे त्या दरातच प्रवाशांना सेवा देण्याची कसरत महामंडळ प्रशासनाला करावी लागत आहे. वाढलेल्या डिझेलच्या दराचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्न आता सतावत आहे. सध्याला दैनंदिन २० ते २५ लाख रुपयांचा ताेटा सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत पुरेसे डिझेल मिळत नसल्याचीही तक्रार आहे. आहे त्या इंधनावर उत्पन्नाची सांगड घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ग्रामीण भागातील ऑपरेशन बंद...

लातूर जिल्ह्यातील विविध मार्गावर सुरू करण्यात आलेली प्रवासी सेवा सध्या बंद करण्याची वेळ महामंडळ प्रशासनावर आली आहे. केवळ भारमान आणि डिझेलच्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ५० टक्के ऑपरेशन थांबले आहे. दरराेज, ग्रामीण भागातील गावा-गावातून काही प्रवाशांचा फाेन येत आहे, की साहेब आमच्या गावाची बस कधी सुरू करता. लालपरी सुरू करण्याची तयारी आहे मात्र अर्थकारण जुळत नसल्याने नाइलाज आहे. सध्याला शाळा, महाविद्यालये आणि इतर व्यवहार पूर्णत: पूर्वपदावर आले नाहीत. यातून प्रवासी भारमान घटले आहे. परिणामी, लालपरीची कसरत आणि परवड सुरूच आहे.

- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर

डिझेलचा तुटवडा कायम...

लातूर विभागासाठी लागणाऱ्या डिझेलचा पुरवठा करण्यात महामंडळाला अडचणी येत आहेत. सध्याला राज्यभरातच डिझेलचा तुटवडा आहे. हा प्रश्न गत काही महिन्यांपासून कायम आहे. ५६ रुपयांचे प्रतिलिटर डिझेल आता ९५ रुपयांवर गेल्याने यासाठी लागणारा निधी दुपटीवर गेला आहे. त्यातच दैनंदिन कारभारासाठी लागणाऱ्या निधीचीही माेठ्या प्रमाणावर तुट आहे. यातून लालपरी रिकामी धावण्याला ब्रेक लागला आहे. ज्या मार्गावर प्रवासी त्याच मार्गावर लालपरी सुसाट आहे. लातूर विभागालाही डिझेलअभावी अनेक बसफेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत.