शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

जेम्बे वाद्याचा ताल, सुरांची रंगतदार मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:44 IST

कोल्हापूर : आर्या आंबेकरची सुरेल गायकी, रोहित राऊतचा रॉकिंग परफॉर्मन्स आणि शिखर नाद कुरेशी यांचा भारतीय व पाश्चिमात्य संगीताचा ...

कोल्हापूर : आर्या आंबेकरची सुरेल गायकी, रोहित राऊतचा रॉकिंग परफॉर्मन्स आणि शिखर नाद कुरेशी यांचा भारतीय व पाश्चिमात्य संगीताचा सुरेख मेळ साधत अंतर्नाद करणारे वादन अशा संगीतमयी सादरीकरणाने मंगळवारी (दि. २) कोल्हापूरकरांची सायंकाळ रंगली. एकीकडे एप्रिलमधील उन्हाचा तडाखा सुरू असताना कलेचा वारसा जपणाऱ्या आणि कलासक्त करवीरकरांना या कलाकारांच्या लाईव्ह कॉन्सर्टने आपल्या रंगारंग गीतसुरांनी चिंब केले.केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत’ आयोजित व सेलो प्रेझेंट्स पॉवर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यावतीने ‘सूर ज्योत्स्ना’ या राष्ट्रीय संगीत पुरस्कारावर मोहोर उमटवलेली गायिका आर्या आंबेकर व सिनेगायक रोहित राऊत यांच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सूर ज्योत्स्ना’ राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेता वादक शिखर नाद कुरेशी याची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ‘सखी मंच’च्या संस्थापक व संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व ‘सूर ज्योत्स्ना अँथम’ने झाली. यावेळी चकोते ग्रुप आॅफ कंपनीजचे चेअरमन अण्णासाहेब चकोते, पंडित विनोद डिग्रजकर, गार्डियन ग्रुपचे कृष्णा दिवटे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले उपस्थित होते.सुरेल प्रवासाची सुरुवात शिखर नाद कुरेशी यांच्या जेम्बे या पाश्चिमात्य वाद्यवादनाने झाली. भारतीय अभिजात संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाफ करीत जेम्बेवर शिताफीने फिरणाऱ्या त्यांच्या हातांनी लयकारीत विविध दर्जे, छंद सादर केले.तबल्यासह विविध तालवाद्यांवर हुकूमत, शास्त्रीय संगीताचा ठहराव आणि विविध छंद घेऊन त्यांवर आधारित बोलरचनांचे त्यांनी सादरीकरण केले.सुरेल स्वर आणि रसिक मनांचा ठाव घेत गायिका आर्या आंबेकरने ‘बोलावा विठ्ठल’ या भक्तिगीताने गायनाची सुरुवात केली ‘आदिमाया अंबाबाई’ गीतातून कोल्हापूरच्या देवीला वंदन केल्यानंतर तिने रसिकांना प्रेमगीतांच्या दुनियेची सफर घडविली. ‘येऊ कशी प्रिया,’ ‘दिवा लावू दे...’ नंतर सादर झालेल्या ‘हृदयात वाजे समथिंग’ या गाजलेल्या गाण्याला टाळ्या, शिट्ट्यांनी अस्सल कोल्हापुरी पद्धतीची दाद मिळाली. ‘तुला पाहते रे’ या टायटल सॉँगला ‘वन्समोअर’ची फर्माईश आली. ‘उगवली शुक्राची चांदणी’ या मराठमोळ्या लावणीनंतर ‘सजन दारी आला काय आता करू’ या स्वरचित गीताने आपल्या गायकीची सांगता केली.रॉकस्टार रोहित राऊतच्या रॉकिंग परफॉर्मन्सने तर कोल्हापूरकरांना थिरकायला लावले. मन उधाण वाºयाचे, मला वेड लागले प्रेमाचे या गीतांनी मंंत्रमुग्ध करीत त्याने गायनाची सुरुवात केली. अनोख्या पद्धतीने गायलेली ‘आज जाने की जिद ना करो’ ही गाजलेली गझल तर वाहवा मिळवून गेली.यानंतर रसिकांनाही थिरकायला भाग पाडत जोश आणि अखंड ऊर्जेने त्याने तू जाने ना, कबिरा मान जा, मितवा, दिल से रे, बन्नो चली ससुराल... अशा हिंदी गीतांच्या फ्युजनने गाण्यावरची हुकूमत दाखविली. रांगड्या कोल्हापूरकरांना मराठमोळ्या गीतांच्या दुनियेत नेत त्याने ‘डोकं फिरलंया’, ‘जवा नवीन पोपट हा’ आणि अखेरच्या ‘झिंगाट’ गाण्यावर सभागृहाला थिरकवत त्याने लाईव्ह कॉन्सर्टचा समारोप केला.अभिजित कुलकर्णी यांनी कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची मांडणी करीत बहारदार निवेदन करीत कार्यक्रमात रंगत आणली. वृषाली शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.