शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राशिवडेत वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

By admin | Updated: October 5, 2014 00:47 IST

तरुणांवर उपचारात हेळसांड : आरोग्य केंद्रास कुलूप घालण्याचा प्रयत्न

राशिवडे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यवस्थ तरुणास उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने तरुणांनी गोंधळ घातला. १०८ रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकाऱ्यास जमावाने मारहाण केली. संतप्त तरुणांनी रुग्णांसह कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्राच्या बाहेर काढून कुलूप घालण्याचा प्रयत्न झाला. राधानगरी पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. आज, शनिवारी सकाळी राशिवडेतील एका तरुणास अत्यवस्थ स्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे उपस्थित नव्हते. तरुणाची ढासळणारी परिस्थिती पाहून जमावाचा संयम सुटला. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेला फोन करून युवकास कोल्हापूर येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी अंघोळीसाठी गेल्याचे समजले. वैद्यकीय अधिकाऱ्यांविना रुग्णवाहिका पाठविण्यात आली. डॉ. शिंदे याठिकाणी पोहोचल्यानंतर संतप्त जमावाने प्रश्नांची सरबत्ती करून शिंदे यांना मारहाण सुरू केली. काहींनी आरोग्य केंद्रास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरपंच अतुल पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर असल्याने असे प्रसंग घडत असून, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद कदम यांनी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे यांची चौकशी करून, त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)