शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद देशात पहिली यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST

कोल्हापूर : सत्तारूढ आणि विरोधी अशी वाटणी न करता सर्वांना सोबत घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषद ...

कोल्हापूर : सत्तारूढ आणि विरोधी अशी वाटणी न करता सर्वांना सोबत घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषद देशात पहिली यावी, यासाठी काम करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुश्रीफ शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुश्रीफ, अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अभिवादनानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात बोलताना मुश्रीफ म्हणाले, यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिली आल्याबद्दल मी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक संरचनेचा पाया घातला. कोयना धरणाची उभारणी केली. म्हणून आज महाराष्ट्र प्रकाशात दिसतो आहे. यावेळी मुश्रीफ यांच्या हस्ते पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात न्यू पॅलेस विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाचे प्रात्यक्षिक झाले. विद्यामंदिर बाचणी आणि कणेरीवाडीच्या विद्यार्थ्यांनी दोरीवरील मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, प्रतिष्ठानचे अशोक पोवार, रमेश मोरे, माणिक मंडलिक, चंद्रकांत सूर्यवंशी, भरत रसाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

विद्युत रोषणाई आणि साखर पेढे वाटप

जिल्हा परिषद राज्यात पहिली आल्याबद्दल नागाळा पार्क येथील इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सकाळी साखर-पेढ्यांचे वाटप केेले. पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनीच जिल्हा परिषद राज्यात पहिली आल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

१२०३२०२१ कोल झेडपी ०१

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद प्रांगणातील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

१२०३२०२१ कोल झेडपी ०२

यशवंत पंचायत राज अभियानामध्ये राज्यात पहिला क्रमांक आल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नागाळा पार्क येथील इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

छाया.. आदित्य वेल्हाळ