शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेचा चढता आलेख

By admin | Updated: June 22, 2015 00:25 IST

जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी गुणवत्तेकडे झेप घेत असल्याचे दिसते. या मूल्यांकन मोहिमेतून जिल्ह्यातील काही गुणवंत आणि आदर्श शाळांचा आढावा आजपासून...

कोल्हापूर जिल्हा प्रगत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी परिवर्तन चळवळीचा. नव्या विचारांना समर्थपणे सामोरे जाणारा. शिक्षकांचे प्रयत्न, गुणवत्ता वाढीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि समयदान करण्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांचे मूल्यांकन करून श्रेणी वर्गीकरण केले असता, जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी गुणवत्तेकडे झेप घेत असल्याचे दिसते. या मूल्यांकन मोहिमेतून जिल्ह्यातील काही गुणवंत आणि आदर्श शाळांचा आढावा आजपासून...समाजाच्या प्रगतीसाठी केवळ शिक्षण नव्हे, तर दर्जेदार व गुणवत्तेचे शिक्षण आवश्यक आहे. हे ओळखून ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा ‘गुणवत्ता विकास कार्यक्रम’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविण्याचा निर्धार केला. विभागीय आयुक्तांपासून ते शिक्षकांपर्यंत गुणवत्ता वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न व त्या दृष्टीने वाटचाल दमादमाने सुरू केली. त्याचे फलित म्हणजे २०१३ पासून २०१५ पर्यंत ‘अ’ श्रेणीतील शाळांच्या संख्येत झालेली वाढ होय. शाळेचे व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वर्षातून एकदा करण्यात येते. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे स्वयंमूल्यमापन हे मूल्यांकन प्रपत्रकाच्या आधारे केले जाते. हे प्रपत्रकात अगदी विचारपूर्वक आणि शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता या दोन्हींचा समावेश असे आहे. सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यांकन व्हावे म्हणून या प्रपत्रकामध्ये १८७ प्रश्न वा माहिती विचारली असून, त्या प्रत्येकास गुण ठेवलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या वर्गकामांचे मूल्यमापनसुद्धा होते. एकूणच शाळा व विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक उठाव या सर्व बाबींना निश्चित कालावधी देऊन केलेले मूल्यांकन शाळेच्या गुणवत्तेचा आरसा ठरतो.स्वयंमूल्यमापन हे प्रपत्रक ‘अ’च्या आधारे तालुका स्तरावर केले जाते. त्यासाठी प्रत्येक तालुक्याची समिती स्थापन केली आहे. तालुक्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन २०० गुणांचे करून गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक काढले जातात. गुणांच्या आधारे शाळांचे वर्गीकरण करण्यात येते ते असे - २०० गुणांपैकी ९० ते १०० टक्के ‘अ’ श्रेणी, ८० ते ८९ टक्के गुण म्हणजे ‘ब’ श्रेणी, ६० ते ७९ टक्के गुणांसाठी ‘क’ श्रेणी आणि ४० ते ५९ टक्के गुण मिळाल्यास ‘ड’ श्रेणी व शेवटची श्रेणी ‘इ’ साठी ० ते ३९ टक्के निर्धारित केले आहेत.नावीन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी, संगणक व ई-लर्निंग, अप्रगत मुलांसाठी विशेष अध्यापन, लेखन-वाचन प्रकल्प, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय व पुस्तक वितरण वाटप नोंदी, एल.सी.डी. प्रोजेक्टर, इंटरनेट वगैरेंमुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढलेला आहे. पर्यावरण, हात धुवा दिन, आॅक्सिजन पार्क, गांडूळ खत प्रकल्प, सुरेख बाग, देखणी इमारत हे सगळं पाहून जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी गुणवत्तेकडे झेप घेत असल्याचे दिसते. शाळांना अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे. तरीही गाठलेला गुणवतेचा चढता आलेख ‘रिमार्कबेल’च. - डॉ. लीला पाटील++वास्तव लक्षात आले ते असेबारा तालुक्यांतील फक्त १२ शाळा या २०१२-१३ मध्ये ‘अ’ श्रेणीमध्ये होत्या; मात्र शिक्षणाधिकारी भेट, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रयत्न, निकालाचे चावडी वाचन, माता-पालक बैठका, पालकांचे उद्बोधन, जाणीव जागृतीसाठी प्रबोधन व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा क्रियाशील सहभाग यांमुळे प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत गेली.शिक्षकांचे प्रयत्न, गुणवत्ता वाढीसाठी जिद्द व महत्त्वाकांक्षा आणि समयदान करण्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे २०१२-१३ मध्ये फक्त १२ शाळा ‘अ’ श्रेणीमध्ये होत्या, त्या २०१४-१५ मध्ये २०६ पर्यंत पोहोचल्या आहेत.‘ब’ श्रेणीमधील शाळांची संख्या २०१२-१३ मध्ये ३४० होत्या. त्या वाढून १३२१ झाल्या. ‘क’ श्रेणीतील शाळांची संख्या १६१० वरून ४७८ इतकी कमी झाली आहे. २०१२-१३ मध्ये ‘ड’ श्रेणीतील शाळा ५८ इतक्या होत्या, तर २०१४-१५ मध्ये ती संख्या फक्त ० इतकी राहिली. ४विशेष प्रकर्षाने लक्षात आलेली बाब म्हणजे ‘इ’ श्रेणीत आता एकही शाळा आज राहिलेली नाही, असा हा गुणनिहाय उंचावलेला आलेख. सर्व शिक्षा अभियान, माझी समृद्ध शाळा, एक दिवस शाळेसाठी, प्रेरणा दिवस, हिरवी शाळा पुरस्कार यांसारखे उपक्रम राबविण्यात शिक्षण खात्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न ही यशासाठीची कारणे तर आहेत.