ग्रामपंचायतीच्या सभागृहात सदस्यांच्या व्यापक बैठकीतही निवड झाली. अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रवीण माने होते . यावेळी उपसरपंच सुवर्णा दिंडे, उत्तम चव्हाण, तानाजी गोदडे, कृष्णात सुतार, रंजना दिंडे शालाबाई कांबळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते, कुंभी-कासारीचे माजी संचालक सीताराम पाटील, माजी सरपंच सूर्यकांत दिंडे, कोटेश्वर विकास संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ वरुटे, भगवान दिंडे, आनंदा दिंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती दिंडे,आदी मान्यवर उपस्थितीत होते. ग्रामसेवक आर. आर. भगत यांनी प्रास्ताविक केले. शेवटी संग्राम बचाटे यांनी आभार मानले.
( फोटो ओळ= बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या सरपंचपदी युवराज भगवान दिंडे यांची निवड )