शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST

कोल्हापूर : बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला साने गुरुजी वसाहत परिसरात सापळा रचून अटक केली. अजित सुखदेव ...

कोल्हापूर : बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला साने गुरुजी वसाहत परिसरात सापळा रचून अटक केली. अजित सुखदेव कांबळे (वय २४, रा. लक्ष्मीटेक परिसर, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर), असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत राउंड, असा ५० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे, दारूगोळा जप्त करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.नि. प्रमोद जाधव यांनी पोलीस पथके नेमून शोध सुरू केला. यावेळी साने गुरुजी वसाहत परिसरात एका मंगल कार्यालयाच्या परिसरात एक तरुण गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती पथकातील पोलीस वैभव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून तातडीने त्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयावरून अजित कांबळे याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत राउंड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला मुद्देमालासह जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर केले.

ही कारवाई पो. नि. प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखली सहा. पो. नि. किरण भोसले, पोलीस नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, उत्तम सडोलीकर, रणजित कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित पाटील, रफिक आवळकर, तसेच सायबर पोलीस ठाणेकडी, पोलीस अमर वासुदेव यांनी केली.

फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०१

ओळ : आरोपीकडून जप्त केलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे.

फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०२

ओळ : कोल्हापुरात साने गुरुजी वसाहत परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी अजित कांबळे याला अटक केली.

130921\13kol_4_13092021_5.jpg~130921\13kol_5_13092021_5.jpg

फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०१ओळ : आरोपीकडून जप्त केलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे.फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०२ओळ : कोल्हापूरात सानेगुरुजी वसाहत परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाने  सोमवारी अजित कांबळे याला अटक केली. ~फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०१ओळ : आरोपीकडून जप्त केलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे.फोटो नं. १३०९२०२१-कोल-क्राईम०२ओळ : कोल्हापूरात सानेगुरुजी वसाहत परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाने  सोमवारी अजित कांबळे याला अटक केली.