शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पेडअप एफएसआयवर ५० टक्के सवलत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अतिरिक्त चटई निर्देशांक (पेडअप एफएसआय) मंजूर करताना आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यात ५० टक्के सवलत देण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अतिरिक्त चटई निर्देशांक (पेडअप एफएसआय) मंजूर करताना आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्यशानाने गुुरुवारी घेतला. कोल्हापुरात महापालिकेने निश्चित केलेला दर ३५ टक्के असून नव्या निर्णयामुळे त्यामध्ये निम्मी सवलत मिळू शकते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांनाच या सवलतीचा लाभ होईल, असे बांधकाम क्षेत्राला वाटते.

अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करताना आकारण्यात येणारे अधिमूल्य हे शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीच्या मर्यादित स्थानिक महापालिका आकारतात. एकात्मिक बांधकाम नियमावली लागू केल्यापासून हा दर सर्वच महापालिकांसाठी ३५ टक्के निश्चित करण्यात आला आहे. त्याशिवाय जिने, पॅसेजेस, कपाटाचा भाग, बाल्कनी हे जे अतिरिक्त बांधकाम होते, त्यासाठी रेडिरेकनरच्या १० टक्के रक्कम आकारण्यात येत होती. आता नव्या निर्णयानुसार या दोन्ही म्हणजे ४५ टक्के कराची जी रक्कम होईल त्याच्या ५० टक्के सवलत मिळणार आहे.

पेडअप एफएसआयची रक्कम भरल्याशिवाय बांधकाम परवाना मिळत नाही. कोणत्याही प्रकल्पाच्या सुरुवातीलाच बांधकाम व्यावसायिकांकडे आर्थिक देयता कमी असते. त्यामुळे या रक्कम कशा कमी करता येतील अशी मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे व्यवहार ठप्प असताना बांधकाम व्यावसायिकांकडून झाली होती. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाची दूसरी बाजू अशी आहे की जो विकासक या सवलतीचा लाभ घेईल त्याने ती मालमत्ता विकताना ग्राहकाचे मुद्रांक शुल्काची रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यायचा की नाही हे विकासकाला ऐच्छिक आहे.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात तीन ते चार प्रकारचे प्रिमियम असतात. रेडिरेकनरचा दरही तिथे जास्त असतो. त्यामुळे तेथील विकासकाला हा निर्णय फायदेशीर ठरेल. कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्राला त्याचा फारसा लाभ होईल असे वाटत नाही. विशेष म्हणजे हा निर्णय ऐच्छिक आहे.

विद्यानंद बेडेकर

अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर