शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक विवाहातून योगेश फोंडेंची सामाजिक बांधीलकी

By admin | Updated: June 4, 2015 00:57 IST

विधायक उपक्रम : खर्चाला फाटा देत नेपाळ भूकंपग्रस्तांना १५ हजारांची मदत

कोल्हापूर : पुरोहितशाही, कर्मकांड अशा पारंपरिक पद्धतीच्या विवाहाला फाटा देत सह्याद्री लोकविकास संस्थेचे सचिव डॉ. योगेश फोंडे व रुपाली बाडगंडी (सोलापूर) यांनी सत्यशोधक पद्धतीने बुधवारी विवाह केला. इतर विवाहांप्रमाणे कसलाही डामडौल न करता अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या नववधू-वरांवर टाकण्यात आल्या. विवाहात होणारा खर्च टाळून १५ हजार रुपयांची मदत या नवदाम्पत्याने नेपाळ भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिली.शाहू स्मारक भवन येथे हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुतणे सुभाष पाटील, ‘माकप’चे नेते चंद्रकांत यादव, भाकपचे नेते कॉ. नामदेव गावडे, के. डी. खुर्द उपस्थित होते. मुलीचे मामा दत्ता हुंडेकर, आई सुमित्रा बाडगंडी, मुलाचे वडील आनंदराव फोंडे, आई संध्या फोंडे, भाऊ गिरीष फोंडे हेही यावेळी उपस्थित होते.स्वातंत्र्यपूर्व काळात कॅप्टन उत्तम पाटील यांच्यासाठी सानेगुरुजी यांनी तयार केलेली प्रतिज्ञा ‘अंनिस’चे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी वधू-वरांना शपथ दिली. सांगलीचे सदानंद कदमलिखित समतेवर आधारित आधुनिक मंगलाष्टका इंद्रायणी पाटील व संजय रेंदाळकर यांनी म्हटली.भाकपचे शहर सचिव अनिल चव्हाण यांनी सत्यशोधक विवाहाची भूमिका स्पष्ट केली. कृष्णात कोरे यांनी सूत्रसंचालन केले. सतीशचंद्र कांबळे यांनी आभार मानले. हरिष कांबळे यांनी वधू-वरांसह पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी रघुनाथ कांबळे, शिवाजी शिंपी, यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नेपाळमधील काही गावे पुनर्वसनासाठी दत्तक घेणारपुरोहितशाही, कर्मकांड व विषमतेवर आधारित परंपरेला फाटा देत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी हा विवाह पार पडला. विवाहातील २५ टक्के रक्कम म्हणजे १५ हजार रुपये नेपाळमधील भूकंपग्रस्तांना देण्यात आला. वर्ल्ड फेडरेशन आॅफ डेमॉक्रटिक युथचे उपाध्यक्ष गिरीष फोंडे यांच्या नेतृत्वाखालील जगभरातील युवक नेत्यांचे शिष्टमंडळ मंगळवार (दि. ९) ते गुरुवार (दि.११) नेपाळला भेट देऊन तेथील काही गावे पुनर्वसनासाठी दत्तक घेणार आहे. त्यावेळी ही रक्कम सरकारला देण्यात येणार आहे.