शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या अंकविक्रेत्याकडून कोविड रुग्णांना योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

शिवानंद पाटील। गडहिंग्लज : अख्ख कुटुंबं कोरोनाबाधित झालेले, पत्नी, मुलगा, मुलगी गृह अलगीकरणात तर स्वत: कोरोना काळजी केंद्रात अशा ...

शिवानंद पाटील। गडहिंग्लज :

अख्ख कुटुंबं कोरोनाबाधित झालेले, पत्नी, मुलगा, मुलगी गृह अलगीकरणात तर स्वत: कोरोना काळजी केंद्रात अशा अवस्थेत कोरोनावर मात करून परतलेल्या करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील ‘लोकमत’चे अंकविक्रेते राजाराम इंगळे यांनी इतर रुग्णांना आणि गावकऱ्यांना कोरोनाच्या संकटात मोलाची साथ दिली आहे. त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंगळे हे ५ मे रोजी कोरोनाबाधित झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही बाधित झाले. उपचारासह योग आणि मानसिक खंबीरपणामुळेच इंगळे कुटुंबाने कोरोनाची लढाई जिंकली. राजाराम इंगळे हे गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील कोविड चाचणी केंद्रात उपचार घेत होते. त्यावेळी त्यांनी बाधित रुग्णांची अवस्था जवळून पाहिली.

कोविड केंद्रातील बरेच रुग्ण हे आजाराच्या दुखण्यापेक्षा मानसिक दुखण्यानेच खचत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मानसिकता ढासळलेल्या व्यक्ती उपचारांना कसा प्रतिसाद देणार आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा कशी होणार.

त्यासाठी त्यांनी रुग्णांचे मानसिक संतुलन ठीक राहावे, उपचारांना चांगला प्रतिसाद मिळावा आणि जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळावी या हेतूने रुग्णांना रोज सकाळी एक तास योगाचे धडे देण्यात सुरुवात केली. सामाजिक अंतर व कोरोना नियमांचे पालन करून रुग्णांचा व्यायाम घेतला.

गेल्या दहा वर्षांपासून इंगळे योगसाधना व एक तास व्यायाम करतात. त्यामुळे कोरोनावर मात करणे त्यांना सहज शक्य झाले.

दरम्यान, मुमेवाडी (ता. आजरा) येथे जि. प. सदस्य उमेश आपटे यांनी सुरू केलेल्या कोविड केंद्रावर जाऊन इंगळे यांनी रुग्णांना योगाचे धडे दिले. त्यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनीही त्यांच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

-------------------------

फोटो ओळी : कोरोनाग्रस्तांना योगाचे धडे..! ‘लोकमत’चे अंकविक्रेते राजाराम इंगळे यांनी कोविड केंद्रातील कोरोना रुग्णांना योगाचे धडे देऊन कोरोनावर मात करण्यासाठी त्यांच्यामध्ये नवी ऊर्जा निर्माण करत आहेत.

क्रमांक : २३०५२०२१-गड-०१