शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीला बगल देणारे वर्ष

By admin | Updated: February 8, 2015 01:10 IST

उद्या सभेत शिक्कामोर्तब : आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा परिणाम

कोल्हापूर : महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आॅक्टोबरमध्ये होऊ घातली असल्याने निवडणुकीच्या तोंडावर शहरवासीयांवर करवाढ लादायची नाही, असा निर्धार पालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी केल्यामुळे सन २०१५-१६ या नवीन आर्थिक वर्षात शहरवासीयांची करवाढीतून सुटका होणार आहे. औपचारिक निर्णयावर सोमवारी (दि. ९) महापालिका सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे घरफाळा, पाणीपट्टी, परवाना विभागाचे कर हे गतवर्षीप्रमाणेच राहतील. फेब्रुवारी महिना उजाडला की, महानगरपालिका प्रशासनाचे विविध विभाग उत्पन्नवाढीकरिता करवाढीचे प्रस्ताव तयार करून आधी स्थायी समितीकडे आणि त्यानंतर महासभेकडे मंजुरीकरिता पाठवितात. पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत घरफाळा, पाणीपुरवठा, परवाना, इस्टेट, रुग्णालय, अग्निशामक यासह विविध करांचे दर निश्चितीवर निर्णय घेऊन महासभेने प्रशासनाकडे प्रस्ताव द्यायचे असतात. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याचा निर्णय दोन्ही सत्तारूढ पक्षांच्या नेत्यांनी घेतला. त्यामुळे कार्यालयीन प्रस्तावही तसेच देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या; परंतु परवाना दरात सरासरी दहा टक्क्यांपर्यंत वाढ सुचविली आहे. पाणीपुरवठा विभागाने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही. अग्निशमन दलाचा रुग्णवाहिका व शववाहिका यासाठी काही प्रमाणात भाडे आकारण्याचा विचार होता. टेंडर नोंदणी, परवाना नोंदणी अशा जनरल करात साधारणपणे १० ते २० टक्के दरवाढ सुचविण्यात आली आहे; परंतु स्थायी समितीने मागच्या वर्षाप्रमाणेच करांचे दर ठेवावेत, अशी शिफारस करून प्रस्ताव महासभेकडे पाठविले आहेत. सोमवारी महासभा होत आहे. या सभेपुढे सदरचे प्रस्ताव निर्णयाकरिता ठेवले आहेत. (प्रतिनिधी)