शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जिल्ह्यातील ‘एफआरपी’च्या टक्क्यांत यंदा वाढ

By admin | Updated: September 26, 2015 00:18 IST

शुगर लॉबीत अस्वस्थता : तोडणी- वाहतूक जाता जिल्ह्यातील कारखान्यांना द्यावी लागणार २५०० ते २७३० रुपये प्रतिटन उचल

प्रकाश पाटील -- कोपार्डे --शुगर केन कंट्रोल आॅर्डर १९६६ कलम ब (३) नुसार एफआरपीप्रमाणे दर देणे कायद्याने कारखान्यांवर बंधनकारक आहे. हंगाम २०१४-१५ च्या साखर उताऱ्यावर हंगाम २०१५/१६ च्या हंगामातील ऊसदर द्यावा लागणार आहे. मागील हंगामातील साखर उताऱ्यानुसार व एफआरपीतील प्रतिक्विंटल वाढीनुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांना द्याव्या लागणाऱ्या एफआरपीच्या टक्क्यात वाढ झाल्याने शुगर लॉबीत अस्वस्थता पसरली आहे.केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने हंगाम २०१५-१६ च्या हंगामातील उसासाठी उचित व लाभकारी मूल्यात (एफआरपीने) केवळ १०० रुपये प्रतिटन वाढ केली असून, पहिल्या ९.५ टक्के उताऱ्यासाठी २३०० रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. ९.५ टक्क्यांच्या पुढील प्रति एक टक्का उताऱ्यासाठी २४२ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. यातून पुन्हा तोडणी वाहतूक किमान ५०० रुपये वजा करण्यात येते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम २०१४-१५ मधील साखर उतारा पाहिल्यास तो १२ टक्क्यांपासून १३.३० टक्के इतका आहे. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना किमान २५०० ते २७३० रुपयांप्रमाणे एफआरपी ऊस तोडणी व वाहतूक वजा जाता बसणार आहे. साखरेच्या दरात झालेली घसरण, साखरेचा शिल्लक साठा यामुळे २०१४-१५ च्या हंगामातील शेतकऱ्यांची थकीत रक्कम केंद्र शासनाच्या सॉफ्ट लोनमधून भागविताना कारखानदारांची मोठी दमछाक झाली आहे. हंगाम २०१५-१६ साठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना प्रतिटनप्रमाणे बसणारी एफआरपी (यातून तोडणी-वाहतूक खर्च वजा केलेला नाही)कारखान्याचे हंगाम त्यानुसार बसणारी नाव२०१४-१५ चा हंगाम २०१५-१६साखर उताराएफआरपी (रु.)वारणा साखर कारखाना१२.५१३०२८.४२पंचगंगा इचलकरंजी१३.०३३१५४.२६कुंभी-कासारी, कुडित्रे१३.०३३१५४.२६बिद्री१३.०४३१५६.६८भोगावती१२.५५३०३८.१०दत्तशिरोळ१२.४४३०११.४८गडहिंग्लज हरळी१२.१५२९४१.३०शाहू-कागल१२.६६३०६४.७२जवाहर, हुपरी१२.४४३०११.४८छ.राजाराम, बावडा११.९९२८८०.४०आजरा शेतकरी१२.५०३०९८.६०उदय गायकवाड, बांबवडे१२.५१३०२८.४२मंडलिक हमिदवाडा१२.९४३१३२.४८शरद, नरंदे१२.९१३१२५.२२डी. वाय. पाटील, पळसंबे१२.२५२९६३.०८दत्त दालमिया, आसुर्ले१३.३४३२२९.२८गुरुदत्त, टाकळी१३.२२३२००.२४इको केन१२.४३३००९.०६हेमरस१३.३३३२२६.८६महाडिक शुगर्स१२.४२३००६.६४सेनापती संताजी१२.९२३१२८.६४