शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

यात्रेमुळे एस. टी. ‘सुसाट’

By admin | Updated: February 12, 2015 00:23 IST

सौंदत्तीसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक बुकिंग : पंढरपूर यात्रेतून दीडकोटीचे उत्पन्न

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.च्या प्रवासी सेवेला घरघर लागल्याने तिचे आर्थिक उत्पन्न कमी होत आहे, अशी ओरड सगळीकडे सुरू आहे. मात्र, एस. टी. महामंडळाचा कोल्हापूर विभाग याला अपवाद ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांनी विविध यात्रांसाठी एस.टी.लाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या पंढरपूर यात्रेतून कोल्हापूर विभागाला एका यात्रेमधून एक कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले. तेच उत्पन्न गतवर्षी ६५ लाख इतके होते; तर सौंदत्ती यात्रेसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक बुकिंग झाले आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. तथापि, प्रवाशांची सेवा करतानाही हे महामंडळ तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत होते. यामध्ये महामंडळातील कोल्हापूर विभाग हा तोटा कमी करण्यासाठी आपल्या विभागात नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवीत आहे. प्रवाशांचे एस.टी.शी नाते अधिक दृढ करण्यासाठी जानेवारीपासून सध्या सुरू असलेल्या विविध यात्रांसाठी गतवर्षीपेक्षा यंदा एस.टी.च्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाल्याने या यात्रेमधून कोट्यवधींचे उत्पन्न कोल्हापूर विभागाने मिळविले आहे; तर प्रवासी संख्या वाढविण्यामध्ये कोल्हापूर विभाग यशस्वी झाला आहे.फेब्रुवारीत गडहिंग्लज येथील काळभैरी यात्रेतून ३ लाख ४९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी याच यात्रेतून ३ लाख ३० हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा ४३ हजार २५५ प्रवाशांनी गाड्यांचा लाभ घेतला. यासह कर्नाटक सीमेवरील दड्डी (ता. चंदगड) येथील यात्रेतून १ लाख ४३ हजार २३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीपेक्षा या दोन्ही यात्रांमध्ये पाच हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास करीत एस. टी.ला पसंती दिली. पौर्णिमा यात्रेनिमित्त नृसिंहवाडी व जोतिबा यात्रेसाठी एक लाख आठ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा एस.टी.ला पहिली पसंती दिली. ही विश्वासार्हता कायम ठेवल्यास तोट्यातील एस. टी. नक्कीच पुन्हा फायद्यात येण्यास वेळ लागणार नाही. कर्नाटक एस.टी. ‘आउट’दरवर्षी सौंदत्ती यात्रेला जाण्यासाठी महाराष्ट्रातील प्रवासी कर्नाटक एस.टी.ला पसंती देत होते. कोल्हापूर विभागाच्या वतीने केलेल्या नियोजनामुळे यंदा आजतागायत सर्वांत जास्त ७२३ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. दरवर्षी साधारणपणे ४०० च्या आसपास गाड्यांचे बुकिंग होत होते. यंदा आजच्या तारखेपर्यंत ७२३ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यासह अजून पंधरा दिवस शिल्लक असल्याने सुमारे ८०० गाड्यांचे बुकिंग होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बुकिंगमध्ये कागल, राधानगरी व संभाजीनगर ही आगारे पुढे आहेत. तसेच या यात्रेमध्ये कुठेही गाडीला बिघाड होऊ नये यासाठी सौंदत्ती येथे यात्राकाळात यांत्रिकी विभागाचे कर्मचारी २४ तास तैनात ठेवण्यात आले आहेत.एस.टी.बाबत असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचारी, वाहक व चालकांमार्फत गावातील सरपंच, गावकरी यांच्याशी संपर्क साधून एस.टी. गाड्या बुकिंग करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार प्रवाशांनी आम्हाला सहकार्य केले. यापाठीमागे आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी, वाहक व चालक यांचे सहकार्य लाभले. - सुहास जाधव, विभाग नियंत्रक