शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

महापालिकेसाठी ‘महायुद्ध’

By admin | Updated: September 29, 2015 00:10 IST

आठवी पंचवार्षिक निवडणूक : भाजपची कसोटी तर दोन्ही काँग्रेससह शिवसेनेचा घरोबा शक्य

विश्वास पाटील -- कोल्हापूर महापालिकेची नोव्हेंबर २०१५ मध्ये होऊ घातलेली ही आठवी पंचवार्षिक निवडणूक आहे. ४० नगरसेवकांवरून सुरू झालेली नगरपालिका आता या निवडणुकीत ८१ नगरसेवकांना निवडून देणार आहे. अपक्षांना निवडून दिल्यावर पदाधिकारी निवडीत घोडेबाजार होतो, अशी टीका झाल्यानंतर गत निवडणुकीपासून पक्षीय पातळीवर ही निवडणूक होत आहे. या वेळेलाही ती तशीच होत असली, तरी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची खरी कसोटी असेल. सध्या या पक्षाचे अवघे दोन सदस्य आहेत व त्यांना ही संख्या ४१ वर नेण्याचे दिव्य आहे.राज्यात सत्ता आल्यानंतर सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे लोकमानस भाजपच्या बाजूने आहे की ते बदलले आहे, याचाही फैसला या निवडणुकीमुळे होणार आहे. राज्यात व केंद्रात सत्तेत असलेले भाजप व शिवसेना हे दोन पक्ष कोल्हापूर महापालिकेतही स्वतंत्रपणे लढत आहेत. सत्तेनंतर या दोन पक्षांतील दरी चांगलीच रुंदावली आहे. त्यामुळे एकवेळ काँग्रेस-राष्ट्रवादी चालेल; परंतु या जुन्या मित्रांची संगत नको, अशी या दोन्ही पक्षांची मानसिकता दिसते आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसला यश मिळाले तर त्यांची सत्ता व मदत लागली तर शिवसेनेलाही ते बरोबर घेऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतील.महापौरपदाची संधीआगामी महापौरपद ‘नागरिकांचा मागासवर्ग महिले’साठी आरक्षित आहे. एकूण ८१ पैकी अकरा प्रभाग त्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतींना मोठे महत्त्व येणार आहे. हे अकरा प्रभाग सोडून ‘सर्वसाधारण प्रवर्गा’तून एखादी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला निवडून आल्यास ती देखील महापौरपदाची दावेदार ठरू शकते, परंतु तशी संधी मिळण्याची शक्यता फारच धूसर असते. ‘नागरिकांचा मागासवर्ग महिलां’साठी आरक्षित झालेले प्रभाग असे : पोलीस लाईन, सर्किट हाऊस, बाजारगेट, महालक्ष्मी मंदिर, यादवनगर, राजारामपुरी-तवणाप्पा पाटणे हायस्कूल, सुभाषनगर, राजलक्ष्मीनगर, सानेगुरुजी वसाहत, मध्यवर्ती सभागृह आणि रायगड कॉलनी-बाबा जरगनगर.एकही महापौर आमदार नाही...महापालिकेत आतापर्यंत ४२ महापौर व ३९ उपमहापौर झाले आहेत. यापैकी एकाही व्यक्तीस दुसऱ्यांदा महापौर होण्याची संधी मिळालेली नाहीच शिवाय एकही महापौर आतापर्यंत आमदारही झालेला नाही. महादेवराव आडगुळे, बाबूराव पारखे, दिनकर पाटील, रामभाऊ फाळके (लोकसभेला) आर. के. पोवार, प्रल्हाद चव्हाण यांनी विधानसभेला नशीब आजमावून पाहिले परंतु या शहराने त्यांना ती संधी दिली नाही.विद्यमान सभागृहातील पक्षीय बलाबल पक्षसंख्याबळपैकी अपक्षांचा पाठिंबाकाँग्रेस३३०२राष्ट्रवादी २६०१शिवसेना-भाजप आघाडी०९०२ जनसुराज्य आघाडी०९०५स्वीकृत ०५ काळा डागमहापालिकेच्या तत्कालीन महापौर तृप्ती माळवी यांना ३० जानेवारी २०१५ ला महापौर दालनातच १६ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. महापौरांनाच लाच घेतल्याच्या संशयावरून पकडण्यात आल्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. त्यामुळे या शहराची बेअब्रू झाली. निवडणुकीवर दृिष्टक्षेप : आठवी पंचवार्षिक निवडणूकएकूण प्रभाग : ८१ सर्वसाधारण प्रवर्गातील प्रभाग : एकूण ४८ (त्यांतील महिला २४)नागरिकांचा इतर मागासवर्गीय - ओबीसी : एकूण २२ (त्यांतील महिला ११)अनुसूचित जाती : एकूण ११ (त्यांतील सहा महिला)निव्वळ महिलांसाठी आरक्षित प्रभागांची संख्या : ४१शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या : ५ लाख ४९ हजार २३६शहराची मतदार संख्या : ४ लाख ७० हजारएका प्रभागातील सरासरी लोकसंख्या : ६ हजार ७८०एका प्रभागातील सरासरी मतदारसंख्या : ५६००सरासरी बाराशे ते दीड हजार मतदानात लागणार गुलालगाड्या जमा..!---महापालिकेची निवडणूक राज्य आयोगाने सोमवारी दुपारी जाहीर केल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महापौरांसह सर्व आठ पदाधिकाऱ्यांच्या गाड्या प्रशासनाने रात्री सुभाष रोडवरील के.एम.टी. कार्यशाळेत जमा करून घेतल्या.पानसरे स्वीकृत नगरसेवकदिवंगत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हे १९६७ ते १९७२ च्या सभागृहात ‘स्वीकृत नगरसेवक’ होते. त्यावेळी ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून चांगल्या माणसांना संधी देण्याची प्रवृत्ती होती. त्यामुळे पानसरे यांच्यासोबतच दत्तात्रय कणेरकर, दत्तात्रय खराडे, हरिभाऊ प्रभावळकर, मालती भोसले यांना ‘स्वीकृत’ म्हणून काम करता आले.