शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

...हद्दवाढप्रश्नी ‘त्या’ गावांची कार्यशाळा

By admin | Updated: March 25, 2015 00:39 IST

पी. शिवशंकर : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नियोजन, महापालिका हद्दवाढीचे फायदे समजावून सांगणार

कोल्हापूर : ‘राजकीय विरोध’ या कारणास्तव कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारत असल्याचे पत्र शासनाने महापालिका प्रशासनास दिले. हद्दवाढ होणार किंवा नाही, झाल्यास किती गावे समाविष्ट होणार, संभाव्य गावांची समजूत कशी काढणार, शासनाकडून या सर्वांना कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत अनेक प्रश्न शहरवासीयांत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनास हद्दवाढीचा पुनर्प्रस्ताव सादर करण्यापूर्वी एप्रिल महिन्यात संभाव्य सर्व १७ गावांतील ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख नागरिकांची कार्यशाळा घेणार आहे. त्यामध्ये हद्दवाढीचे फायदे समजावून सांगणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.शहराची हद्दवाढ होण्याकरिता महानगरपालिका पातळीवर तसेच शहरातील नागरिक, विविध संघटना यांनी अनेक वर्षांपासून बऱ्यापैकी प्रयत्न केले आहेत; परंतु त्यांच्या प्रयत्नांवर मर्यादा पडल्या. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच हद्दवाढीला पुन्हा ‘खो’ बसला. ग्रामीण जनतेलाही महानगरपालिकेच्या सुविधा पाहिजेत; परंतु शहरात यायला नको वाटते. रखडलेली हद्दवाढ करताना तोंडदेखलेपणा नको. चार-दोन गावांचा होणारा शहरातील समावेश नगरसेवकांना नको आहे. शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे जसा शहराला फटका बसत आहे, तसा तो ग्रामीण भागातील जनतेलाही बसलेला आहे, हे आता सर्व पातळ्यांवर पटवून सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शहराची हद्द वाढली की, केवळ शहराला फायदा होईल आणि मूळच्या ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होईल, अशी भीती पद्धतशीरपणे बिंबविण्यात आली आहे. ही भीती व फायद्याचे मुद्दे समजावून सांगण्यासाठीच आयुक्त पी. शिवशंकर हे पुढाकार घेणार आहेत. ग्रामीण जनतेच्या हद्दवाढीमुळे होणाऱ्या समस्या समजावून घेणे व त्यांचे निराकरण करण्याचे उपाय सांगणे. तसेच अंमलबजावणीची तरतूद कशा प्रकारे करता येईल या माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता आयुक्तांनी हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभाव्य गावांतील प्रमुखांची कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा झाल्यानंतर या कार्यशाळेचे नियोजन केले जाणार आहे.हद्दवाढ रोखण्यामागे राजकीय नेत्यांच्या हिशेबाचे राजकारण हे प्रमुख कारण आहे. आपला पारंपरिक मतदार शहरी भागात गेला, तर आपल्याला निवडणुका जिंकणे काहीसे अवघड होऊ शकते, ही राजकारण्यांची भीती आहे. त्यातूनच त्यांनी ग्रामीण जनतेत हद्दवाढीबाबत गैरसमज निर्माण केले आहेत. आयुक्त प्रशासकीय बाजू सांभाळत असतानाच नगरसेवकांनी राजकीय बाजू सांभाळण्याची गरज असल्याची चर्चा आहे.कार्यशाळा घेऊन संभाव्य गावांत हद्दवाढीबाबत असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. कार्यशाळेद्वारे हद्दवाढीमुळे होणारे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.- पी. शिवशंकर, आयुक्त