कोल्हापूर : मध्यमवर्गीय लोक कोणाच्या सांगण्यावरून जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून कुठेही गुंतवणूक करतात. अशा लोकांमध्ये जागृती घडावी, याकरिता शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग व बँक आॅफ इंडिया अध्यासन, सेबी, म्युच्युअल फंड यांच्यावतीने ‘आपल्या कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा असावा’ या विषयावर कार्यशाळा होत आहे. शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र विभागातील सभागृहात शुक्रवारी (दि. १६) दुपारी तीन वाजता ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी दिली.
‘कुटुंबाच्या अर्थसंकल्पा’वर उद्या कार्यशाळा
By admin | Updated: January 14, 2015 23:19 IST