शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेला मराठा आरमाराच्या प्रमुख शक्ती केंद्रांपैकी एक असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी समुद्राच्या लाटांनी झिजविली असून, बुरूजचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तिकेंद्र असलेला महत्त्वाचा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण अवस्थेत पोहोचला असल्याचे काही शिवभक्तांनी माझ्या लक्षात आणून दिले होते. या गडाला ऑगस्टमध्ये भेट देऊन पाहणीसुद्धा केली. त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिकमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना भेटून गडाची सद्य:परिस्थिती लक्षात आणून दिली. त्यासह लवकरच तटबंदी आणि बुरुजाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली होती. त्यावर या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र सोमवारी मुंबई पुरातत्व कार्यालयाकडून मला प्राप्त झाले आहे. या संवर्धनाच्या कामासाठी दिल्लीतील पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाकडूनही मान्यता मिळाली असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
‘विजयदुर्ग’च्या तटबंदी, बुरुजाचे काम लवकरच सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST