शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बसर्गेतील स्पर्धेत महिलांच्या उत्स्फुर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 15:41 IST

स्वयंसिद्धा संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आर्थिक साक्षरता कार्यशाळा

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातीय बसर्गे येथे घेण्यात आलेल्या टाकाऊ कापडापासून विक्रीयोग्य वस्तूंच्या स्पर्धेमध्ये पंधरा आणि पापडाच्या स्पर्धेमध्ये बाविस महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. टाकाऊ कापडाच्या स्पर्धेमध्ये नंदा भेंडवाडे यांना गोधडी शिवण्यासाठी आणि राजमाता महिला बचत गटाला पापड निर्मितीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या स्वयंसिद्धा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बसर्गेमध्ये महिला व युवतींसाठी टाकाऊ कापडापासून विक्रीयोग्य वस्तू व विविध प्रकारचे पापड या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.दोन्ही स्पर्धांचे परीक्षण स्वयंसिद्धाच्या तज्ञ व अनुभवी समीक्षिका संगीता जाधव आणि मंदा आचार्य यांनी केले. दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच बक्षिसे वितरीत करण्यात आली. स्पर्धांसोबत याप्रसंगी घेण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेमध्ये स्वयंप्रेरिका सहकारी महिला औद्योगिक संस्थेच्या उपाध्यक्षा सौम्या तिरोडकर आणि सेन्ट्रल बँकेच्या निवृत्त अधिकारी सुमेधा पंडित यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये जन-धन, अटल पेन्शन, प्रधानमंत्री सुरक्षा व जीवनज्योती विमा इत्यादि शासकीय योजनांची माहिती व महत्व समजावून सांगण्यात आले. खेळ, गटचर्चा व गाण्यांच्या माध्यमातून बचतीचे महत्व सांगण्याबरोबर घर व उद्योगाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे आणि प्राधान्यक्रम कसा ठरवावा याविषयी प्रबोधन करण्यात आले.नव्वद महिलांचा उत्स्पूर्त प्रतिसाद व उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन स्वयंसिद्धा संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीने बसर्गे ग्रामपंचायत सदस्य रूपा हिरेमठ आणि शुभांगी येडूरकर यांनी केले. स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभाला बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी यांची प्रमुख उपस्थिती होती.