शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टरची ‘क्लिप’

By admin | Updated: January 10, 2016 01:11 IST

डॉक्टरास अटक : मेडिकलच्या वसतिगृहात निद्राधीन अवस्थेतील चित्रीकरण

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचे झोपलेल्या अवस्थेत मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण (क्लिप) व छायाचित्रे काढल्याप्रकरणी सीपीआरमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरास शनिवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी डॉ. फणी किरण कोटा (वय ३१, रा. रंगारेड्डी, तेलंगणा) असे त्याचे नाव आहे. या घटनेने सीपीआरमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयाच्या (सीपीआर) पाठीमागील बाजूस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थिनी वसतिगृह आहे. याठिकाणी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरही राहतात. गुरुवारी (दि. ७) ड्युटी संपवून आल्यानंतर संबंधित महिला डॉक्टर आपल्या रूममध्ये कॉटवर विश्रांती घेत होत्या. त्यावेळी त्यांची अचानक खिडकीकडे नजर गेली असता तेथे मोबाईल लपविलेला दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजू-बाजूच्या डॉक्टर धावत रूममध्ये आल्या. या प्रकाराने महिला डॉक्टर घाबरून गेल्या. त्यांना इतर डॉक्टरांनी धीर देत शांत केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली. चौकशीवरून हा मोबाईल संशयित डॉक्टर फणी कोटा याचा असल्याचे निष्पन्न झाले. पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणी शनिवारी संबंधित डॉक्टरच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी मोबाईल तपासला असता त्यामध्ये पीडित डॉक्टर महिलेची झोपलेल्या अवस्थेतील छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप आढळली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी शेंडा पार्कातील याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात मेडिकलचा विद्यार्थी जयंत रमेश तोंडे (वय २०, रा. मूळ गाव अहमदनगर, पाथर्डी) याला रॅगिंग करून मारहाण केली होती. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी रूपेंद्रसिंग रामदाससिंग मीना, राहुलकुमार मीना, सुमित कुमार रॉय व राहुल रामकृष्ण जाजोरिया (सर्व रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती. त्यांच्यावर महाविद्यालयीन प्रशासनाने कारवाईही केली आहे. या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा डॉक्टर महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याने महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चेहरा लपविण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात डॉक्टर महिलेची छायाचित्रे काढणाऱ्या व मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या डॉ. फणी किरण कोटा या प्रशिक्षणार्थी डॉक्टरास शनिवारी पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याने तोंड लपविण्याचा प्रयत्न केला. फोन उचलला नाही याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी वारंवार मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन उचलला नाही.