शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याण सभापती निवडीस तूर्त मनाई

By admin | Updated: May 14, 2016 01:28 IST

सोमवारी पुढील सुनावणी : वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा आदेश

कोल्हापूर : महानगरपालिक ा महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीला येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी तूर्त मनाई आदेश दिला. मंगळवारी होणाऱ्या सभापती निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असतानाच न्यायालयाने हा निकाल दिल्यामुळे सत्तारूढ काँग्रेस-ताराराणी आघाडी आणि प्रशासन यांच्यात मोठी खडाजंगी उडाली. त्यामुळे महापालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मनाई आदेश कायम होणार की उठविला जाणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे सभापतिपद रिक्त झाले आहे. नवीन सभापती निवडीसाठी मंगळवारी (दि. १७ मे) महिला बालकल्याण समितीची सभा जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राजकीय सत्तासंघर्षातून वृषाली कदम यांचे नगरसेवकपद घालविले असल्याचा समज काँग्रेस नगरसेवकांचा झाला आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीला स्थगिती मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात गुरुवारी याचिका दाखल केली होती. त्यावर देशमुख यांचे वकील सासवडे यांनी एक तास युक्तिवाद करून या निवडीला स्थगिती मिळावी म्हणून मागणी केली होती. शुक्रवारी दुपारी न्यायाधीश श्री. डफळे यांनी मंगळवारी होणाऱ्या सभापती निवडीला तूर्त मनाई आदेश दिला. सोमवारी महानगरपालिका प्रशासनास न्यायालयात येऊन म्हणणे मांडण्यास न्यायालयाने बजावले आहे. त्यामुळे आता सोमवारी महानगरपालिका आपली बाजू सोमवारी न्यायालयात मांडणार आहे. मनाई आदेश कायम राहणार की तो उठविला जाणार हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सभापती निवडणूक आता अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. जातीचे दाखला अवैध ठरल्यामुळे महापौर, महिला बालकल्याण समिती सभापतिसह सात जणांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. महानगरपालिकेतील सत्तासंघर्षातून हे सगळे घडल्याचा आक्षेप कॉँग्रेसने नोंदविला असून ही सर्व प्रकरणे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)