शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कदमवाडीत पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST

कोल्हापूर : पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कदमवाडी परिसरात घाटगे कॉलनीतील शिवांजली अपार्टमेंटमध्ये घडली. मंजूषा ...

कोल्हापूर : पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कदमवाडी परिसरात घाटगे कॉलनीतील शिवांजली अपार्टमेंटमध्ये घडली. मंजूषा विनायक कागले (वय ३८), असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विनायक कागले यांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ते शिवांजली अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर फ्लॅटमध्ये पत्नी, आई, दोन मुलांसह राहतात. रविवारी रात्री उशिरा सर्वजण जेवण करून एकत्रित गप्पा मारत बसले होते. विनायक यांना मणक्याचा त्रास आहे, त्यामुळे मणका दुखू लागल्याने त्यांची पत्नी मंजूषा या त्यांच्या मणक्याला मलम लावत होत्या. त्यानंतर त्या गरम पाण्याचा शेक देण्यासाठी स्वयंपाक खोलीनजीकच्या पोर्चमध्ये गेल्या. काही वेळातच बेसमेंटमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यावेळी विनायक व त्यांची आई हे दोघे पोर्चमध्ये धावले, पण तेथे मंजूषा नव्हत्या. त्याचवेळी बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मंजूषा पडल्याचे वरूनच दिले. परिसरात मोठा आवाज आल्याने अपार्टमेंटमधील नागरिकही घटनास्थळी दाखल झाले. पाचव्या मजल्यावरून डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. रात्री उशिरा घडलेल्या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. माहिती मिळताच तातडीने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. मृत मंजूषा कागले यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे.

फोटो नं. २३०८२०२१-कोल-मंजूषा कागले

230821\23kol_12_23082021_5.jpg

फोटो नं. २३०८२०२१-कोल-मंजूषा कागले