शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण न करता दूध उत्पादक केंद्रबिंदू मानूनच कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये आतापर्यंत विरोधाला विरोधाचे राजकारण कधी झाले नाही आणि आताही ते होणार नाही. दूध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये आतापर्यंत विरोधाला विरोधाचे राजकारण कधी झाले नाही आणि आताही ते होणार नाही. दूध उत्पादक केंद्रबिंदू मानूनच कारभार करणार असून, नेत्यांनी शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

शुकवारी अध्यक्ष निवडीनंतर ते संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. अध्यक्ष पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आघाडीच्या नेत्यांनी अध्यक्ष पदाची संधी दिली, त्या विश्वासास पात्र राहून काम करू. चौघे पराभूत झाले असले, तरी त्यांची मदत पॅनेल निवडून आणण्यात यश आले. उत्पादकांना दोन रुपये जादा देणे, वासाचे दुधासह सभासदांना जास्तीत-जास्त परतावा देणे, याकडे गांभीर्याने लक्ष राहणार आहे.

ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, दूध उत्पादकांचे हित हीच विरोधक आणि आमच्या टॅगलाईन आहे. ‘गोकुळ’मध्ये एक व्यवस्था आहे, त्यातूनच पुढे जावे लागते. विश्वास पाटील हे मला वरिष्ठ आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कसब असल्याने त्यांच्याकडे प्रश्न पेलण्याची ताकद आहे. प्रा. किसन चौगले, अजित नरके, बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर, अंजना रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.

नूतन संचालकांचा पायगुण

‘गोकुळ’चे रोजचे ७० हजार लिटर दूध संकलन असताना, आपण संचालक झालो, आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली एक लाख लिटर झाल्यानंतर दिवंगत मुख्यमंत्री वसतंदादा पाटील यांना बोलावून कलशपूजन केले. ईदला विक्रमी दूध विक्री होते. यावर्षी तब्बल १६ लाख १ हजार ८९५ लिटरची विक्री झाली. गेल्यावर्षीपेक्षा २ लाख २८ हजार लिटरने वाढली, हा नूतन संचालकांचा पायगुण असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

आणि आपटेंची खुर्ची आपण घेतली

रवींद्र आपटे यांच्या १४ जानेवारी २०१९ च्या अध्यक्ष निवड सभेत अध्यक्षांच्या खुर्चीवर आपण, तर तिसऱ्या खुर्चीवर आपटे बसले होते. अध्यक्ष निवडीनंतर ते तिसऱ्या खुर्चीवरून अध्यक्षांच्या खुर्चीवर आणि आपण तिसऱ्या खुर्चीव बसलो. त्याचवेळी पुन्हा अध्यक्षांच्या खुर्चीवर आपण बसणार, हे त्यांना सांगितले होते. अशी आठवण विश्वास पाटील यांनी सांगितली.

आपटेंसारखा राजकारणातील मित्र गमावला

रवींद्र आपटे व आपले फार जुने ऋणानुबंध होते, आम्ही रूम पाटर्नर होतो. ३५ वर्षांत एकमेकाला कधी विसरलो नाही. दुर्देवाने त्यांचा पराभव झाल्याने राजकारणातील मित्र गमावल्याची भावना अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली.

संचालक मंडळात दोनवेळाच संघर्ष

‘गोकुळ’च्या इतिहासात दोनवेळाच संचालकांत संघर्ष झाला. १२ मार्च १९९० ला आनंदराव पाटील-चुयेकर व अरुण नरके यांना अध्यक्ष निवडीत समान मते पडली आणि चिठ्ठीव्दारे चुयेकर अध्यक्ष झाले. त्यानंतर अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरून २८ डिसेंबर २०१८ ला कोरम असताना काही संचालक बाजूला जाऊन बसले. अशा दोनवेळाला आमच्यात संघर्ष झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

आणि ३५ वर्षे गायी-म्हैशींच्या सेवेत गेलीत

संचालक मंडळात उच्चशिक्षित आहे. सगळ्यात ज्येष्ठ असलो, तरी तुलनेत कमी शिकलेला आपणच असल्याने अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावर, वसंतदादा पाटील हेही चौथी पास होते, असे डोंगळे यांनी सांगितले. शिकण्यासाठी आई-वडिलांचा खूप आग्रह असायचा, शिकला नाहीस तर गुरं-ढाेरं राखशील. असे सांगत होते आणि खरेच गेली ३५ वर्षे गायी-म्हैशींच्या सेवेत गेल्याचे पाटील यांनी सांगितले.

‘आबाजी’ श्रीकृष्ण, तर डोंगळे ‘बलराम’

विरोधकांना सोबत घेऊन आपणाला दूध उत्पादकांसाठी काम करायचे आहे. ‘गोकुळ’मध्ये विश्वास पाटील (आबाजी) श्रीकृष्ण, तर अरुण डोंगळे ‘बलराम’ असल्याचे अजित नरके यांनी सांगितले.

नावडकर नव्हे, आवडकर

कोरोनाच्या काळात ‘गोकुळ’ची निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संघाच्यावतीने वैभव नावडकर व डॉ. गजेंद्र देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, वैभव नावडकर यांचे नाव जरी नावडकर असले तरी त्यांनी सगळ्यांना आवडेल असे काम केल्याने त्यांना ‘आवडकर’ म्हणायला पाहिजे.

खाडे, नरके यांनी केले अभिनंदन

निवड सभेला विरोधी संचालक बाळासाहेब खाडे, चेतन नरके, अंबरीष घाटगे व शौमिका महाडिक उपस्थित होत्या. निवड बिनविरोध झाल्यानंतर त्यांनी सभागृह सोडले. त्यापैकी खाडे व नरके यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले.

अंबाबाईचे दर्शन घेऊन विश्वास पाटील संघात

सकाळी अकरापासूनच सत्तारूढ गटाचे संचालक ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात येत होते. अध्यक्षपदाचे नाव गुरुवारी रात्रीच निश्चित झाल्याने विश्वास पाटील यांना तशी कुणकुण होती. त्यामुळे त्यांचे समर्थक ताराबाई पार्क कार्यालयात एकत्रित येत होते. पाटील यांनी थेट गावाकडून येताना अंबाबाईचे दर्शन घेऊनच ताराबाई पार्कात आले. तेथून सर्व संचालकांना फेटे बांधून निवड सभेसाठी पाठवण्यात आले.

टीम अजिंक्यतारा सक्रिय

अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत पालकमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक अग्रेसर होते. प्राचार्य महादेव नरके, माजी नगरसेवक मोहन सालपे, भरत रसाळे, डी. डी. पाटील आदी टीम सक्रिय दिसत होती.