शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

'Winner' ‘आशीर्वाद व्हिला’ रंगला गुलालात...- धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 19:45 IST

धैर्यशील माने यांचे रुईकर कॉलनीतील ‘आशीर्वाद व्हिला’ हे निवासस्थान गुरुवारी गुलालात न्हाऊन निघाले. मतमोजणी सुरू झाल्यापासून धैर्यशील मानेंना मताधिक्य असल्याने सकाळपासूनच फटाक्यांची आतषबाजी, गुलाल, शिवसेनेचे भगवे झेंडे घेतलेले

ठळक मुद्दे निवेदिता माने यांनी आई-वडिलांना विजयाचा गुलाल लावून त्यांचे आशीर्वाद घेतले.सायंकाळी विजयी घोषित झाल्यानंतरच ते कोल्हापुरात परतले. त्यानंतर घरासमोर एकच जल्लोष झाला.

कोल्हापूर : धैर्यशील माने यांचे रुईकर कॉलनीतील ‘आशीर्वाद व्हिला’ हे निवासस्थान गुरुवारी गुलालात न्हाऊन निघाले. मतमोजणी सुरू झाल्यापासून धैर्यशील मानेंना मताधिक्य असल्याने सकाळपासूनच फटाक्यांची आतषबाजी, गुलाल, शिवसेनेचे भगवे झेंडे घेतलेले कार्यकर्ते आणि ‘धैर्यशील मानेंचा विजय असो,’ ‘बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सकाळीच देवदर्शनासाठी गेलेले धैर्यशील सायंकाळी विजयी घोषित झाल्यानंतरच निवासस्थानी परतले.

हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात लढत होती. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीलाच धैर्यशील मानेंना मताधिक्य जाहीर झाल्याने सकाळी आठ वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी सुरू झाली. माजी खासदार निवेदिता माने या कार्यालयात बसून मताधिक्याचे अपडेट जाणून घेत होत्या. बाहेर सत्त्वशील माने कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते.

येथे भाजप-शिवसेनेचे झेंडे आणि कार्यकर्त्यांना पाणी, सरबत अशी सरबराई सुरू होती. फेरीनिहाय मताधिक्याचे आकडे वाढत होते तसा कार्यकर्त्यांमधील उत्साहदेखील वाढत होता. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. कार्यकर्ते गळ्यात शिवसेनेचे तसेच भगवे झेंडे व शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे घेऊन जल्लोष करीत होते.धैर्यशील माने यांचे देवदर्शनया सगळ्या जल्लोषासाठी स्वत: धैर्यशील व त्यांच्या पत्नी वेदांतिका मात्र उपस्थित नव्हत्या. मतांच्या आकडेवारीच्या घालमेलीत वेळ घालविण्याऐवजी देवदर्शनाचा निर्णय घेऊन ते सकाळीच सिद्धनाथ मंदिर, रुकडी, जोतिबा, नृसिंहवाडी, अंबाबाई मंदिर, प्रज्ञापुरी येथील स्वामी समर्थ मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर या देवस्थानांना गेले. इकडे घरी कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. ते तासाभरात पोहोचतील, असा दिवसभर निरोप येत असला तरी सायंकाळी विजयी घोषित झाल्यानंतरच ते कोल्हापुरात परतले. त्यानंतर घरासमोर एकच जल्लोष झाला.आजोबांंना अश्रू अनावरआपल्या नातवाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धैर्यशील यांचे आजी-आजोबा ‘आशीर्वाद व्हिला’मध्ये आले. आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना पाहताच निवेदिता यांनी त्यांना घट्ट मिठी मारली. यावेळी त्यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. निवेदिता माने यांनी आई-वडिलांना विजयाचा गुलाल लावून त्यांचे आशीर्वाद घेतले.मगच गुलाल...धैर्यशील माने यांना सुरुवातीपासून मताधिक्य असले तरी कार्यालयात बसलेल्या निवेदिता माने आणि सत्त्वशील माने यांची घालमेल सुरू होती. कार्यकर्ते गुलालात रंगले होते; पण हे मायलेक धैर्यशील यांच्या विजयश्रीवर शिक्कामोर्तब होणाऱ्या मताधिक्याची वाट पाहत होते. अखेर दुपारी बारानंतर धैर्यशील यांच्या मताधिक्याचे आकडे वाढत गेले आणि विजयाची खात्री पटल्यानंतरच दोघेही गुलालात न्हाऊन निघाले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालhatkanangle-pcहातकणंगले