शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरच्या समस्यांवर ‘नेम’ साधणार ?

By admin | Updated: March 4, 2015 23:43 IST

आमदारांनी घेतली बैठक : विविध पक्ष, संघटनांनी मांडल्या समस्या; शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या

जयसिंगपूर : शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्यासमोर अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या मांडल्या. प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका आ. पाटील यांनी घेतल्यामुळे जयसिंगपूरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सत्ताधारी विरुद्ध नाराजगट या बैठकीत एकत्र आल्याने ‘एका दगडात दोन पक्षी मारण्याचा नेम’ आ. पाटील कसा साधतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे.पालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात आ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. शहरातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय पक्ष, तरुण मंडळे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक व शहरवासीय असे बैठकीचे स्वरूप होते. शहरात उड्डाण पूल व्हावा, मोकाट जणावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, उपनगरातील रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणी, अन्न सुरक्षा योजना, वाहतूक कोंडी, शिरोळ रस्त्याचे पालिकेकडे हस्तांतरण, ज्येष्ठांसाठी विरगुंळा केंद्र, क्रीडांगण, लक्ष्मीपार्कमधील समस्या, तंबाखूवरील वाढविण्यात आलेला व्हॅट यामुळे कामगारांच्या रोजगाराचा उभा राहिलेला प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यांसह अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. आ. पाटील यांनी प्रश्नाबाबतची गाऱ्हाणी ऐकून सकारात्मक भूमिका व्यक्त केली. प्रसंगी रस्त्यावर उतरू असाही इशारा त्यांनी दिला आहे. ‘आमदार आपल्या दारी’ या भूमिकेतून आ. पाटील यांनी जयसिंगपूर शहरापासून सुरुवात केली आहे. याचे जनतेतून स्वागत होत असले तरी शहरासाठी ते निधी कितपत खेचून आणतात, यावरच बरेच काही अवलंबून आहे. सत्ताधारी विरुद्ध नाराजगट या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी काळात पालिकेची निवडणूकही होणार असल्यामुळे बैठकीच्या निमित्ताने आ. पाटील एका दगडात दोन पक्षी मारण्यात कसे यशस्वी होतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)शहरवासीयांच्या अपेक्षाउड्डाणपूल, मोकाट जणावरांचा बंदोबस्त, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणी, अन्न सुरक्षा योजना, वाहतूक कोंडी, ज्येष्ठांसाठी विरगुंळा केंद्र, क्रीडांगण, तंबाखूवरील व्हॅट.सत्ताधाऱ्यांकडे लक्षआमदार उल्हास पाटील यांनी आयोजित केलेल्या विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीस सत्ताधारी गटाचे नगरसेवक अनुपस्थितीत होते. त्यामुळे आ. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सत्ताधारी विकासकामांतून उत्तर देणार की पत्रकबाजीतून, याकडे लक्ष लागून राहिले आहे.