शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी ‘आयजीएम’कडे बघणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटनेकडे पूर्वसंकेत म्हणून पाहणे आवश्यक ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटनेकडे पूर्वसंकेत म्हणून पाहणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय तपासणी पथकाने आयजीएम रुग्णालयातील त्रुटींबाबतचा अहवाल दिला आहे. त्याचबरोबर ‘लोकमत’नेही यावर प्रकाश टाकला आहे. तरीही प्रशासनाने रुग्णालयातील इलेक्ट्रिकल दुरुस्ती व आग विझविण्याबाबतची अत्याधुनिक यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहिले नाही. या घटनेनंतर तरी आता ‘आयजीएम’कडे बघणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.

आयजीएम रुग्णालय किमान ३०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल निर्माण होऊ शकते. परंतु, सध्या तेथे फक्त २०० बेडची व्यवस्था आहे. त्यातही ४० ते ६० अतिरिक्त रुग्ण दाखल असतात. रुग्णालयात बेड व गाद्या धूळखात पडून आहेत. हे बेड बसविण्यासाठी जागाही उपलब्ध आहे. परंतु, आवश्यक कर्मचारी नाहीत. रुग्णालयात २०० रुग्णांसाठी १५ डॉक्टर आवश्यक असताना तीनच उपलब्ध आहेत. नर्स, वॉर्ड बॉय, टेक्निशियन, इतर स्टाफ व स्वच्छता कर्मचारी कमी आहेत. रुग्णालयातील गर्दी, रुग्ण व नातेवाईक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नाहीत. अशा अडचणीच्या परिस्थितीतून उपस्थित असणाऱ्या प्रमुख डॉक्टरांना रुग्णालय चालवावे लागत आहे.

याचा विपरीत परिणाम रुग्णांवरील उपचारावर होत आहे. अति गरजेनुसारच रुग्णाकडे लक्ष दिले जाते. नियमित प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवणे अशक्य बनले आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. दुरुस्तीसाठी आवश्यक निधी नाही. या सर्व प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्हास्तरावरून तपासणीसाठी आलेल्या पथकाने रुग्णालयातील इलेक्ट्रिकल व फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट केले आहे. रुग्णालयात अनेक ठिकाणी वायरी धोकादायकरीत्या लोंबकळत आहेत. विद्युत पेटी मोडकळीस आली आहे.

अशा जुन्या वायरींमुळे आगीसारख्या भयानक घटना घडतात, याची अनेक मोठी उदाहरणे डोळ्यांसमोर आहेत. तरीही धोकादायक स्थितीत काम सुरू आहे.

मंगळवारी घडलेल्या घटनेतून धडा घेत या दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहून त्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

चौकट

प्रशिक्षित सुरक्षारक्षकाचे प्रसंगावधान

रुग्णालयात हजर असणाऱ्या एका सुरक्षारक्षकाने रुग्णालयातील अग्निरोधक बंब फोडून त्यातून पावडरची फवारणी करत तत्काळ आग विझवली. या बंबाचा वापर करण्याचे प्रशिक्षण त्यांना दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिले होते. त्याचा मंगळवारी पुरेपूर उपयोग झाला; अन्यथा बंब असूनही वापरता येत नसता तर बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. यातून बोध घेत सर्व ठिकाणी अधिकाधिक लोकांना अग्निरोधक बंब वापरण्याचे व आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.