शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

संकल्पपूर्तीसाठी आवश्यकता इच्छाशक्तीची

By admin | Updated: January 1, 2015 00:26 IST

--लोकमत सर्वेक्षण

इंदुमती गणेश -कोल्हापूर -यंदा मी अभ्यास टॉप करणार, यावर्षी मला अमुक नोकरी लागली पाहिजे, मी कुटुंबीयांना विशेषत: मुलांना वेळ देईन, लवकर उठेन, रोज पहाटे नियमित व्यायाम करीन, असे कितीतरी संकल्प आपण नववषार्निमित्त करतो; पण वर्षाखेरीस हा संकल्प फक्त करण्यापुरताच राहिलेला आहे, हे जाणवते; तर बहुतांश व्यक्तींना संकल्प करण्याची गरज आहे, असे वाटत नाही. संकल्पपूर्ती होण्यामागे इच्छाशक्ती आणि जबाबदारीच्या जाणिवेची आवश्यकता आहे; शिवाय काहीवेळा भोवतालची परिस्थिती तशी असावी लागते. संकल्पपूर्तीसाठी अपेक्षित साथ मिळत नाही, असे प्रांजळ मत वाचकांनी व्यक्त केले. नववर्षानिमित्त लोकमतने नववर्षाचे संकल्प या विषयावर शंभर वाचकांचे सर्वेक्षण केले. यात त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारच्या संकल्पांना प्राधान्य देता, संकल्प पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करता, संकल्प पूर्ण करण्यात कोणते अडथळे येतात, संकल्पपूर्तीसाठी काय उपाय सुचवाल, असे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देत ५० जणांनी आम्ही केलेला संकल्प वर्षाखेरीस पूर्ण झालेला नाही, हे मान्य केले. तीस टक्के वाचकांनी संकल्प काही प्रमाणात, तर २० टक्के वाचकांनी ठरल्याप्रमाणे संकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले. आयुष्यात किंवा वर्षभरात काय करायचे आहे, हे ठरवून एकदा त्या दिशेने प्रवास सुरू झाला की त्यात सुरुवातीला सातत्य राहते; नंतर मात्र दिवसागणिक हा संकल्प मागे पडत जातो; पण अनेकदा हा मार्गच ठरलेला नसल्याने ‘काय संकल्प करायचा,’ हा प्रश्नही अनेकांना पडला. चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर नवीन वर्षाचाच मुहूर्त धरला पाहिजे असे नाही; त्यामुळे २५ टक्के व्यक्तींनी आम्ही या दिवशी काही संकल्प करीत नाही, असे सांगितले. संकल्प पूर्ण न होण्यामागे इच्छाशक्तीचा आणि जबाबदारीच्या जाणिवेचा अभावही असतो, हे अनेकांनी मान्य केले. संकल्प पूर्ण होताना त्याचा इतरांना त्रास होता कामा नये किंवा कौटुंबिक स्वास्थ्य बिघडायला नको, अशीही अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. संकल्पपूर्ती केलेल्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे जाणवले. संकल्प जरूर पूर्ण होतात; फक्त त्यासाठी स्वत:वर विश्वास हवा, परिश्रम हवेत, स्वयंशिस्त हवी. वर्तमानाचे भान ठेवून भविष्याचा वेध घेतला तर स्वावलंबी, सुखी, समाधानी व आनंदी जगता येते, हा अनुभवही यानिमित्ताने आल्याचे काहीजणांनी सांगितले. इतरांकडून चेष्टाआम्ही काही संकल्प केला आणि तो इतरांना सांगून त्याची अंमलबजावणी सुरू केली की मित्र-मैत्रिणी अगदी कुटुंबीयांकडूनही त्याची काहीवेळा चेष्टा होते, असा अनुभवही काहीजणांनी विशेषत: तरुणांनी व्यक्त केला. सामाजिक संकल्प असेल तर ‘हा काय आम्हाला ज्ञान शिकवतो!...’ असा कुत्सित भाव आणला जातो; त्यामुळेही अनेकदा मानसिक खच्चीकरण होते. अडथळा मित्रांचासंकल्प पूर्ण न होण्यामागे मित्रांचा फार मोठा अडथळा असतो, असे मत बऱ्याच महाविद्यालयीन तरुणाईने मांडले आहे. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने मी दारू सोडण्याचा संकल्प केला. तो अमलातही आणला; पण मित्रांमुळे तो पुन्हा तुटला, असे मत मांडले. याशिवाय आपण ज्या परिसरात राहतो तेथील वातावरणामुळे किंवा तशी कौटुंंबिक स्थिती नसल्यानेदेखील संकल्प पूर्ण करता येत नाहीत, असेही काहीजणांचे म्हणणे आहे.