शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बदलीतील पैशाच्या वसुलीसाठीच अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:46 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाºयाची पाहिजे तेथे बदली ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाºयाची पाहिजे तेथे बदली न झाल्याने अधिकाºयाच्या पत्नी व मुलीने वकील महिलेकडे पैशांसाठी तगादा लावला होता. गेली आठ वर्षे हा वाद सुरू आहे. अखेर पैसे मिळत नसल्याच्या रागातून त्यांनी या वकिलाच्या घरात घुसून धुडगूस घातल्याचे पोलिसांच्या गोपनीय चौकशीत पुढे आले आहे.दरम्यान, वकील महिलेच्या ओळखीतून गगनबावडा तालुक्यातील माजी सरपंचाने या अधिकाºयाकडून बदलीसाठी एक कोटी रुपये घेतल्याचे समजते.ताराबाई पार्क येथे राहणाºया या वकील महिलेने, घरावर हल्ला करीत साहित्याची तोडफोड व धक्काबुक्की केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाºयाच्या पत्नी व मुलीच्या विरोधात शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, महसूल विभागातील या वरिष्ठाची वकील महिलेशी २००९ पासून ओळख आहे. त्या महिलेचेही अधिकाºयाच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध आहेत. या अधिकाºयाला सोईच्या ठिकाणी बदली हवी होती. त्यासाठी त्याने वकील महिलेच्या मदतीने गगनबावडा तालुक्यातील ‘पाटील’ नावाच्या माजी सरपंचाची भेट घेतली. पाटील याने आपण अधिकाºयाची हवी तिथे बदली करून देतो असे सांगितले. त्याची मंत्र्यांसोबत ऊठबस असल्याने अधिकाºयाचाही विश्वास बसला. वकील महिलेच्या ओळखीतून या माजी सरपंचाने बदलीसाठी मांडवली करण्यासाठी एक कोटी रुपये घेतले. पैसे देऊनही बदली झाली नाही; त्यामुळे अधिकाºयाच्या पत्नीने वकील महिलेकडे पैशांची मागणी केली. तिने आपल्या ओळखीने ‘माजी सरपंच पाटील’ याने पैसे घेतले आहेत, त्याच्याकडून घ्या, असे सांगितले; परंतु ‘आम्ही पैसे तुमच्या विश्वासावर दिले आहेत. ते तुम्हीच दिले पाहिजेत,’ असे म्हणून गेली आठ वर्षे अधिकाºयाची पत्नी पैशांची मागणी करीत होती. माजी सरपंच पाटील यानेही पैसे पुढे दिल्याचे सांगून टाळाटाळ केली होती. संबंधित महसूल अधिकारी पैशाचे नाव काढत नव्हता. त्यांच्या पत्नीला हे खटकत होते. संतापलेल्या पत्नी व मुलीने अखेर वकील महिलेच्या घरात घुसून धुडगूस घातला.शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी वकील महिलेला समोर बसवून अर्ज लिहून घेतला आहे. कट्टे यांनी चौकशी करून प्रकरणाची व्याप्ती मोठी व गुंतागुंतीची असल्याने त्यांनी हा अर्ज शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग केला आहे. येथील पोलिसांनी वकील महिलेला फोन करून रविवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते; परंतु त्या कामानिमित्त मुंबईला गेल्या आहेत. आज, सोमवारी त्या पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब देणार आहेत. या प्रकरणातून महसूल अधिकारी अडचणीत येणार असल्याने त्यावर पडदा टाकण्यासाठी हालचाली सुरू आहेत.माजी सरपंचाकडेहीहोणार चौकशीमहसूल अधिकाºयाच्या बदलीमध्ये मांडवली करणारा माजी सरपंच गगनबावडा तालुक्यात प्रसिद्ध आहे. रमणमळा परिसरात राहून प्रशासकीय कामकाजात मांडवली करण्यामध्ये तो तरबेज आहे. तक्रारीमध्ये त्याचे नाव असल्याने शाहूपुरी पोलीस त्याच्याकडेही चौकशी करणार आहेत.