शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

सीए कामकाजाबाबत कोल्हापुरातच दुजाभाव का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

कोल्हापूर : राज्यातील इतर जिल्ह्यात संचारबंदी असूनही चार्टड अकौंटंटना जीएसटीसह आयकर परतावा, लेखापरीक्षण, हिशेब तपासणी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कामकाज करण्यास ...

कोल्हापूर : राज्यातील इतर जिल्ह्यात संचारबंदी असूनही चार्टड अकौंटंटना जीएसटीसह आयकर परतावा, लेखापरीक्षण, हिशेब तपासणी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कामकाज करण्यास मुभा दिली आहे. मात्र, कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाने या व्यावसायिकांची कार्यालये बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ‘सीए’ची पंचाईत झाली आहे.

राज्यासह देशभरातील व्यापाऱ्यांकरिता जीएसटी विवरण पत्रे भरण्याची अंतिम मुदत असूनही राज्य व केंद्र शासनाने जीएसटी परतावा व कर भरण्यास कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. त्या उलट कर अधिकाऱ्यांना कोरानाच्या कारणामुळे कार्यालयीन अंतर्गत बाबीकरिता मुदतवाढ दिली आहे. राज्याच्या इतर भागात स्थानिक जिल्हा प्रशासनाने चार्टड अकौंटंटना कार्यालयातून काम करण्यास मुभा दिली आहे. मात्र, कोल्हापुरातील जिल्हा प्रशासनाने असे काम करण्यास चार्टर्ड अकौंटंटना परवानगी नाकारली आहे. जीएसटी अथवा आयकर परतावा व कर भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने व्यापारीही मोठ्या अडचणीत आले आहेत. व्यापाऱ्यांकडे दैनंदिन व्यापार नसल्याने आर्थिक, तर कर, परतावा वेळेत न भरल्याने दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या सर्व प्रकारामुळे व्यापारी व चार्टर्ड अकौंटंट यांची मोठी पंचाईत झाली आहे. कोल्हापुरात आजमितीला २५० हून अधिक चार्टर्ड अकौंटंट कार्यरत आहेत.

कोट

जीएसटी रिटर्न देय असताना व्यापाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. त्याकरिता मुदतवाढ दिलेली नाही. त्याच्या उलट कोरोनाचे कारण देऊन नोटीस काढणे, आदी कामांकरिता कर अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. इतर जिल्ह्यात सीएची कार्यालये सुरू आहेत. मात्र, आपल्याकडेच बंद आहेत. असा दुजाभाव का ?

-सीए दीपेश गुंदेशा