शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

सगळ्यांचा आवाज का दाबताय?; महापालिका सभेत विरोधकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:24 IST

. पैसा महत्त्वाचा आहे. तो सुशोभीकरण किंवा वाहतुकीच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली वायफळ खर्च होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. निकम या अजेंड्यावरील विषयांना विरोध करीत आहेत, असा समज झालेल्या शारंगधर देशमुख यांनी ‘विषय भलतीकडे नेऊ नका, नेमका विषय काय आहे तो आधी समजून घ्या,’ अशी विनंती केली.

ठळक मुद्दे निषेध म्हणून सभात्याग

कोल्हापूर : महापालिकेच्या विशेष सभेत सत्यजित कदम, रूपाराणी निकम, किरण नकाते यांना बोलण्याची परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी आघाडीच्या सदस्यांनी गुरुवारी ‘आमच्या सगळ्यांचा आवाज का दाबताय?’अशी थेट विचारणा करीत सभात्याग केला. यावेळी सत्तारूढ व विरोधी गटांच्या सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.

गुरुवारी महापालिकेची विशेष सभा पार पडली. या सभेत अंतर्गत गॅसवाहिनी, वाहतूक उपाययोजना, लाईट शो, महापालिका शाळांतील पायाभूत सुधारणा अशा चार विषयांवर चर्चा झाली. चर्चेवेळी विरोधी गटाच्या रूपाराणी निकम यांनी हरकत घेत शहरातील नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन कामे करावीत. पैसा महत्त्वाचा आहे. तो सुशोभीकरण किंवा वाहतुकीच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली वायफळ खर्च होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. निकम या अजेंड्यावरील विषयांना विरोध करीत आहेत, असा समज झालेल्या शारंगधर देशमुख यांनी ‘विषय भलतीकडे नेऊ नका, नेमका विषय काय आहे तो आधी समजून घ्या,’ अशी विनंती केली. त्यातून वादावादीला सुरुवात झाली. ‘आम्ही सुशोभीकरण करून पैसे वाऱ्यावर घालवत नाही. तो योग्य पद्धतीने खर्च होईल.

मात्र गेल्या पाच वर्र्षांत पैसा कोठे गेला हे आम्हाला कळले नाही,’ असा टोमणा देशमुख यांनी लगावला. त्यावेळी किरण नकाते, सत्यजित कदम यांनी निकम यांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला. दोघे काही बोलत असताना महापौर लाटकर यांनी दोघांनाही खाली बसण्याचा आदेश दिला. ‘एकेकटे बोला, एकदम सगळ्यांनी बोलण्याचा प्रयत्न करु नका,’ असेही त्यांनी सुनावले. सभा कामकाजाच्या इतिवृत्तात तुमचे म्हणणे येणार नाही, असाही आदेश महापौरांनी संबंधित लघुलेखकांना दिला. यावेळी कदम, देशमुख व नकाते यांच्यात खडांजगी उडाली.त्यामुळे विरोधी सदस्य संतप्त झाले. ‘आमच्या सगळ्यांचा आवाज तुम्ही का दाबता आहात, आम्ही योग्य बोलण्याचा प्रयत्न करत असताना बोलू देत नाही. महापौरांची कृती बरोबर नाही,’ अशा शब्दांत विरोधी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पाठोपाठ विरोधी गटाच्या सर्वच सदस्यांनी महापौरांच्या कृतीचा निषेध म्हणून सभात्याग केला.गॅस वाहिनीसंदर्भात प्रशासकीय प्रस्ताव द्याशहरातून गॅसवाहिनी टाकण्याच्या तसेच त्या संदर्भातील खुदाईचे दर ठरविण्याचा सदस्य ठराव सभेच्या अजेंड्यावर होता. त्यावर गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाने अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव महासभेसमोर सादर करा, अशी सूचना केली. सत्यजित कदम यांनी मात्र प्रशासनावर आमचा काडीमात्र विश्वास नाही. खुदाई केल्यानंतर ठेकेदार ते बुजवत नाहीत. अमृत योजनेचा अनुभव ताजा आहे. खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोण घेणार हे स्पष्ट झाल्याशिवाय ठराव करू नका, असे सांगितले. पाठोपाठ राहुल चव्हाण यांनीही भूमिगत गॅसवाहिन्या आम्हाला नकोत असे सांगितले. शारंगधर देशमुख त्यामुळे चिडले. प्रशासकीय प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करू, असे सांगून त्यांनी वादावर पडदा टाकला.थोरात दाम्पत्य करणार शाळांना मदतमहापालिकेच्या शाळेत पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता लागणारा निधी व तज्ज्ञ मनुष्यबळ लोकसहभागातून उभारण्यात येणार असून ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात व त्यांच्या पत्नी रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात याबाबत मदत करणार असल्याचे महापौर अ‍ॅड. लाटकर यांनी सभेत सांगितले. यावेळी अशोक जाधव, विजय खाडे-पाटील यांनी लोक मदत करायला तयार आहेत. मात्र त्यासाठी पाठपुराव्यात सातत्य राखावे, असे आवाहन केले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका