शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

विजयापासून कोण ‘वंचित’ राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:20 IST

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतील निवडणूक दुरंगीच होणार हे स्पष्ट असले, तरी यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा त्रास कुणाला ...

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतील निवडणूक दुरंगीच होणार हे स्पष्ट असले, तरी यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा त्रास कुणाला होणार याबद्दल आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. अटीतटीच्या लढतीत अशा अन्य पक्षांनी घेतलेली मते निर्णायक ठरत असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे.गेल्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष, बहुजन मुक्ती पक्ष, भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या उमेदवारांना एकत्रित मिळालेली मते २५ हजार ७२९ होती. ‘शेकाप’चे माजी आमदार संपतराव पवार यांना १३ हजार १६२ मते मिळाली. नोटाला मिळालेली मते ७०१५ होती आणि खासदार धनंजय महाडिक हे ३३ हजार २५९ मतांनी विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघात याच चार पक्षांना मिळालेली एकत्रित मते २३ हजार २७० होती. नोटाला १० हजार ५९ मते मिळाली. हे सर्व उमेदवार रिंगणात नसते, तर त्यांची एकगठ्ठा मते एकाच कुणाला मिळाली नसती, हे खरेच आहे. या वेळेला ‘शेकाप’ हा काँग्रेसच्या आघाडीत आहे.डावे, आंबेडकरवादी, रिपब्लिकन जनतेचे नेतृत्व करणारे पक्ष हे पारंपरिक काँग्रेसला पूरक विचारधारा असणारे पक्ष आहेत. त्यातही मुख्यत: मुस्लिम समाज हा भाजप-शिवसेनेकडे फारसा वळत नाही. या पक्षांना कोण पराभूत करेल, त्यांच्या पाठीशी हा समाज अनेकदा राहिला आहे. भीमा- कोरेगावच्या प्रकरणानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली, त्यातून दलित समाजातून त्यांना पाठबळ मिळाल्याचे वातावरण तयार झाले आहे. या वेळेला त्यांच्यासोबत एमआयएम हा पक्षदेखील आहे. या पक्षांचे पाठीराखे मतदार एकगठ्ठा मतांसाठी बांधील असल्याचे आजपर्यंत दिसले आहे. त्याची झलक कोल्हापुरात शिवाजी स्टेडियममध्ये झालेल्या त्यांच्या प्रचार सभेवेळी दिसली आहे. जिथे पूर्वी आठवले गटाचे फलक गावाच्या वेशीजवळ दिसायचे, तिथे आता अनेक गावांत वंचित बहुजन आघाडीच्या शाखा झाल्या आहेत; त्यामुळे या आघाडीचे दोन्ही उमेदवार नवखे असले तरी त्यांचा मतांचा टक्का यावेळी वाढण्याची चिन्हे आहेत. विरोधात निवडणूक लढविणाऱ्या पक्षांचा रोख नेहमीच सत्तारूढ नेतृत्वावर असतो; त्यामुळे आताही दोन्ही मतदारसंघांत या पक्षाचे टार्गेट हे काँग्रेस आघाडीचेच उमेदवार असणार आहेत.