शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीपेक्षा पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही, हा विषय महत्त्वाचा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : बारा आमदारांच्या यादीत माझे नाव आहे किंवा नाही यापेक्षा सध्या माझ्या दृष्टीने पूरग्रस्तांना मदत मिळणार ...

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : बारा आमदारांच्या यादीत माझे नाव आहे किंवा नाही यापेक्षा सध्या माझ्या दृष्टीने पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर भाष्य करावे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची ही पदयात्रा शनिवारी सायंकाळी इचलकरंजीत आली. त्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. चार दिवसांपासून शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी ही पदयात्रा सुरू असली तरी जिल्हाधिकारी, मंत्री अथवा राज्य शासनाकडून साधी विचारपूसही झाली, मात्र मी सत्तेत नसताना पदयात्रेदरम्यान सर्वच ठिकाणी झालेले स्वागत सरकारला चपराकच आहे, असे शेट्टी म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मी अनेकांचे उंबरे झिंजवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सूचक म्हणूनही चालतो. मात्र पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे १ मिनिट वेळ नाही, ही शोकांतिका आहे. सरकारकडे बुडव्यांना देण्यासाठी पैसे आहेत; मात्र पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी निधी नाही. सरकारला ही भूमिका महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्वाभिमानीचा आज जलसमाधी मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा आज रविवारी नृसिंहवाडीत दाखल होणार असून, संघटनेचे नेते राजू शेट्टी व संघटनेच्या एकाही कार्यकर्त्याला नृसिंहवाडीत अथवा नदीक्षेत्र परिसरात प्रवेश करता येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चारशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नृसिंवाडीत प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.