शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘परीक्षा संचालक’ निवडीचा मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST

परीक्षा मंडळाच्या नवीन संचालक निवडीची प्रक्रिया विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये सुरू केली. त्याअंतर्गत दाखल झालेल्या १६ अर्जांच्या छाननीची प्रक्रिया ...

परीक्षा मंडळाच्या नवीन संचालक निवडीची प्रक्रिया विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये सुरू केली. त्याअंतर्गत दाखल झालेल्या १६ अर्जांच्या छाननीची प्रक्रिया झाली. मात्र, पुढील कार्यवाही थांबली. त्यानंतर वर्षभरानंतर दि. २१ जुलै रोजी विद्यापीठाने मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी पात्र आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यात महेश काकडे, अर्जुन घाटुळे, सुहास पाटील, शिवाजी मुंडे, योगेश पाटील, सुजाता आडमुठे हे मुलाखतीसाठी पात्र, तर उर्वरित दहाजणांचे अर्ज अपात्र ठरले. विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या परीक्षा संचालकपदाच्या निवडीची प्रक्रिया लवकर होणे आवश्यक आहे.

चौकट

अद्यापही तारीख जाहीर नाही

माजी कुलगुरू डॉ. शिंदे यांचा कालावधी संपण्यास एक वर्षाचा अवधी असताना परीक्षा मंडळाच्या संचालक निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. शिंदे यांचा कालावधी संपल्यानंतर जुलैमध्ये नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू असताना मध्येच विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा संचालक निवडीची प्रक्रिया घाईने सुरू केली. त्यावर विद्यापीठाच्या घटकांची मते जाणून घेऊन ‘लोकमत’ने या निवडीच्या घाईबाबत प्रश्न उपस्थित केल्याने प्रशासनाने संबंधित प्रक्रिया थांबविली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुलाखतीची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे त्यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले होते; पण अद्यापही तारीख जाहीर झालेली नाही.