शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा तलाव सुशोभीकरण कधी ?

By admin | Updated: November 10, 2014 23:56 IST

निविदा प्रक्रिया पूर्ण : बजेटमध्ये विकासकामांना कात्री, तलाव विकासाबाबत कोरडाच

अमर पाटील - कळंबा -शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेला, ७.३५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असणारा, स्थलांतरित पक्षांचे वस्तीस्थान, वनौषधींचे भांडार, पूर्वीचे मासेमारीचे केंद्र, शहर व उपनगराच्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे स्रोत असणारा व कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाची घोषणा होऊन वर्ष उलटले, मात्र, या काळात बजेटअभावी इथल्या विकासकामांना कात्री लागली असून, हा तलाव विकासाबाबत कोरडाच राहणार आहे. तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामी तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजचव्हाण यांनी सुचवल्याप्रमाणे सुरुवातीस ४६ कोटींचा प्रस्ताव पालिकेने सादर केला. त्यास शासनाने कात्री लावून तो १० कोटींवर आणला. पैकी ७ कोटी ७५ लाख उपलब्ध झाले. बजेटच्या कात्रीने सादर विकासकामांपैकी सायकल ट्रॅक, बोटींग, जेटी बांधणे, बोट खरेदी, फूड प्लाझा, गाळ काढणे व प्रक्रिया करणे, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र ते कळंबा पाईपलाईन टाकणे व संरक्षण भिंत या कामांना कात्री लागली आहे. सुशोभीकरणासाठी गतवर्षी दहा कोटींचा निधी मंजूर झाला. पैकी ७ कोटी ७५ लाखांचा निधी दोन महिन्यांपूर्वी पालिकेस वर्ग करण्यात आला. मुळातच संथगतीने कामास सुरुवात झाली. काम निविदाप्रक्रियेत अडकले. पालिकेने काढलेल्या सुरुवातीच्या दोन टेंडरना प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्या निविदेस मात्र, बी.व्ही.जे. इंडिया कंपनीची एकमेव निविदा आली.३ नोव्हेंबरच्या सभेत पालिका उपआयुक्तांनी ही एकमेव निविदा मंजूर करून तांत्रिक मंजुरीच्या कार्यवाहीसाठी पुढे पाठविली. निविदा प्रशासकीय पातळीवर मंजूर झाली, तरी प्रत्यक्ष कामास सुरुवात कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.रेंगाळलेली निविदा प्रक्रिया व बजेट हा प्रश्न जरी मार्गी लागला असला तरी आता तलावास गतवैभव प्राप्त कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तलाव प्रदूषणमुक्त राहून नैसर्गिक ठेवा जतन व्हावा, स्वच्छ हवेसह नागरिकांना मन:शांती मिळावी व विरंगुळा व्हावा हा सुशोभीकरणामागचा हेतू होता. आज या तलावाचे पाणी उपनगर व ग्रामीण जनता पिण्यासाठी वापरत आहे. त्यामुळे तलावाची स्वच्छता कायम ठेवून सुशोभीकरणाचा हेतू साध्य व्हावा, ही सर्वसामान्यांची माफक अपेक्षा.सुशोभीकरणास पाणलोट बांधकामांचा धोका सुशोभीकरणाचा प्रश्न जरी निकाली निघाला असला तरी तलावालगतच्या सायलेंट झोन व नो डेव्हलपमेंट झोनमध्ये हॉटेल्स, पेट्रोलपंप, प्लॉटिंग बांधकामे सुरू आहेत. परवानग्या देताना ग्रामपंचातीने पाणलोट क्षेत्राचे नियम व कायदे यांची खातरजमा केली नाही. उपनगरातील वस्त्यांमुळे रंकाळ्याची जी अवस्था झाली ती कळंबा तलावाची होऊ नये, याची काळजी आता पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.टेंडरधारकांनी पाठ का फिरवली ?पालिका सुशोभीकरणाची पहिली निविदा १२ आॅगस्टला, दुसरी निविदा ११ सप्टेंबरला प्रसिद्ध केली, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. तिसरी निविदा १९ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली. त्याला बी. व्ही. जे. इंडिया कंपनीचे एकच टेंडर आले. प्रत्येक टेंडरमध्ये ढपला संस्कृतीने पालिकेस ग्रासले आहे. ज्याचा परिणाम विकासकामांच्या निविदा प्रक्रियेवर होतोय. निविदा मंजुरीची घाई का ?वास्तविक एकाहून अधिक निविदा व कमी दराची निविदा मंजुरी हा नियम असताना निविदा व कंपनीची पूर्वानुभवाची खातरजमा न करता मंजुरी का, याचे उत्तर अनुत्तरीत आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने पाणलोट क्षेत्रातील बांधकाम बंदीबाबत कायदेशीर निर्बंध घातले आहेत. तलाव सुशोभीकरणानंतरही पंचायत व ग्रामस्थ तलाव प्रदूषणमुक्त ठेऊन सुशोभीकरण कायम ठेवावे.- विश्वास गुरव, सरपंच, कळंबाकळंबा तलाव सुशोभीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा व तलावास वैभव प्राप्त करुन द्यावे. डेव्हलपमेंट झोन बांधकामाबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन तलाव संवर्धन करावे.- सागर भोगम, व्यावसायिक कळंबाअपेक्षित खर्चतलाव सुशोभीकरण कामेसांडवा दुरुस्ती व सांडपाणी प्रक्रिया, तलाव मजबुतीकरण, संरक्षक भिंत, स्लोपिंग लॉन जनावरे धुण्याचा टॅँक, आदींसाठी खर्च पडणारी रक्कम : १५,१४०८८६.२३तलाव सुशोभीकरण, अ‍ॅम्पीथिएटर, पदपाथ, सौरऊर्जा दिवे, प्रसाधनगृहे, सौर उर्जा दिवे, मिनी कुस्ती मैदान, मनोरा, तारेची कंपौंड : खर्च पडणारी रक्कम : ५५,९९५५५५.१३ऐतिहासिक वास्तू संरक्षक, सुरक्षा व्यवस्था वनौषधी झाडे, झुडपे, वृक्षारोपण, बगीचा व्यवस्थापन कार्यालय : खर्च पडणारी रक्कम : ४१,८९७५८.२५विकासकाम मंजूर निविदा :७ कोटी ७५ लाखतलावापुढील समस्यावृक्षतोडीमुळे स्थलांतरित व स्थानिक पक्ष दुर्मीळगाळाचा उठाव नाही, सांडवा व बांधाऱ्याची पडझडगारवेल, केंदाळाचा विळखा, जैवविविधता संपुष्टातनो डेव्हलपमेंट व सायलेंट झोनमध्ये प्लॅटिंग व अवैध बांधकामेजनावरे, कपडे धुणे, आंघोळ, निर्माल्य कचऱ्यासाठी वापर