शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

प्राणीमित्रांनी बैलजोडी कधी सांभाळली?

By admin | Updated: January 9, 2016 00:38 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी संसदेतही बैलगाडी शर्यत बंदी उठविण्याचा कायदा संमत करतील

सांगली : आलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना गावाकडील शेतकरी कशा पद्धतीने बैलांवर प्रेम करतात, हे कसे कळणार? प्राणीमित्रांनी बैलजोडी संभाळली असती, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळले असते. मग त्यांनी बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी कधीच केली नसती, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा वटहुकूम काढला असून, सहा महिन्यात संसदेत तो संमत होणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी देशातील खासदारांना एकत्र करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा संमत करून घेतील, असेही खोत यांनी सांगितले.ते म्हणाले की, खिलार गाई व बैलांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर बैलगाडी शर्यती चालू राहिल्या पाहिजेत, या मागणीसाठी आम्ही २०१२ पासून राज्यभर आंदोलने केली आहेत. खासदार शेट्टी यांनीही या शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी संसदेत केली होती. आताही आम्ही आळंदी येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता. मात्र, शासनाने त्यापूर्वीच शर्यतीवरील बंदी उठविल्यामुळे, आळंदी येथे विजय मेळावा साजरा करणार आहोत. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा राज्यसभा व लोकसभेमध्ये संमत झाला पाहिजे. त्यादृष्टीने खासदार शेट्टी देशातील खासदारांना बैलगाडी शर्यतींचे शेतकऱ्यांच्यादृष्टीने किती महत्त्व आहे ते पटवून देतील. त्यामुळे दोन्ही सभागृहांत हा कायदा संमत होऊन कायदेशीरदृष्ट्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यास मदत होणार आहे. या निर्णयाविरोधात आता तरी प्राणीमित्रांनी कुरघोड्या करू नयेत. त्यांनी बैलगाडी शर्यत बंदीची मागणी करण्यापूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत, असेही खोत म्हणाले. (प्रतिनिधी)समाजसेवकांचा देशभर सुळसुळाटकाखेत शबनम बॅग अडकविली की लगेच समाजकारणी झालो, असा आव आणणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे. या समाजसेवकांचा देशभर सुळसुळाट झाला आहे. आलिशान बंगल्यात राहायचे, शेती करायची नाही, पशुधन सांभाळायचे नाही पण, त्यांच्या व्यथा आम्हालाच खूप कळतात, असा आव मात्र आणायचा. गावगाडा कसा चालतो, हेही त्यांना माहीत नसते. यांच्या अशा भूमिकेमुळेच खिलार जनावरे संपण्याच्या मार्गावर आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी प्राणीमित्रांवर केली.