शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली अभयारण्यग्रस्तांना न्याय कधी?

By admin | Updated: April 2, 2015 00:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : सतराव्या दिवशीही आंदोलन सुरूच

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीच दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलन बुधवारी सतराव्या दिवशीही सुरू होते.शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन बुधवारी सतराव्या दिवशीही सुरूहोते. त्याचबरोबर वनविभागाने मंत्रालयात बैठक घेण्याबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने वनविभागाने मंत्रालयात बैठक घेण्याचा निर्णय न झाल्याने शनिवारी आंदोलकांनी अभयारण्याकडे जाणाऱ्या अंबाईवाडी व खुंदलापूर या दोन्ही फाटकांवर ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा बुधवारचा तिसरा दिवस आहे.प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रातील जमीन संपादन, बुडित गावातील घरे, ताली व जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी ३४ कोटी ८५ लाख ९८ हजार १५५ रुपये इतका निधी तातडीने मिळावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. गेली १७ वर्षे प्रकल्पग्रस्तांना स्थलांतरित करून शासनाने अद्याप पुनर्वसन न केल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी. के. बोडके, शंकर पाटील, शिवाजी पाटील, वसंत पाटील, भागोजी गावडे, धोंडिबा बडेकर, अशोक सोनार, चंद्रकांत बेलवनकर, आदींसह प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. मदतीच्या हातांची गरजआपल्या जमिनी देऊन पुनर्वसनासाठी कित्येक वर्षे संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा वनवास अजून संपलेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतराव्या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरु आहे. सध्या चटके देणारे रणरणते उन्ह असतानाही साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. गावाकडून जेवण आले तर ठीक, नाही तर सकाळच्या एकवेळच्या जेवणावरच आपली भूक भागवून त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली आहे. सामाजिक बांधीलकीतून कोल्हापूरवासीयांनी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.