दत्ता बिडकर -- हातकणंगलेकोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामात सगळ्यात बिकट अवस्था हातकणंगले येथील उड्डाण पुलाची झाली आहे. मुख्य चौकातूनच जाणाऱ्या या पुलाचे काम गेली दीड वर्षे अर्धवट अवस्थेतच आहे. पुलाच्या उभारलेल्या कॉलमचा वाहतुकीला अडथळा होत असल्याने वाहनधारकांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यातच आता सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार सुप्रीम कंपनीमधील पुलाचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. या उड्डाणपुलासाठी मंत्रिमंडळ पायाभूत समितीची मंजुरी नाही. मूळ अंदाजपत्रकात २८ मीटरचा एक गाळा माती भराव पूल असा नियोजित होता. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर नवीन आराखडा मुंजूर होईल या आशेवर ठेकेदार सुप्रीम कंपनीने १२ गाळ्यांचे ३३० मीटरच्या उड्डाणपुलाचे काम शासनाची मंजुरी नसतानाच सुरूकेले. मात्र, मंजुरीअभावी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे हे काम बंद करून अर्धवट उभारलेले कॉलम वाहतुकीला अडथळा होत असल्याने तत्काळ काढण्याचे आदेश दिले. या आदेशाला एक वर्ष झाले तरी ठेकेदार सुप्रीम कंपनीने हे अर्धवट कॉलम अद्याप काढले नाहीत. याप्रकरणी कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश बांधकाम विभागाने हातकणंगले पोलिसांना दिले आहेत.हातकणंगले एस.टी स्टँड, तहसीलदार कार्यालय, पंचायत समितीसह इतर शासकीय कार्यालयांच्या सोयीसाठी आणि इचलकरंजी ते पेठवडगाव मार्गे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी हातकणंगले एस.टी स्टँडसमोर कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणात उड्डाणपूलची तरतूद केली होती. हा उड्डाणपूल २८ मीटरचा एक गाळा असा होता. याला दोन्ही बाजूंनी माती भराव टाकून पूल उभारण्यात येणार होता. त्यामुळे हातकणंगले पेठा विभागाचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग पडणार असल्याने ग्रामस्थ व व्यावसायिकांनी या उड्डाणपुलाला विरोध केला. त्यामुळे ठेकेदार कंपनीने पेठा विभागाचे काम बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाबाबत आणि लोकांच्या मागणीबाबत विचार करण्याची विनंती केली.हातकणंगलेतील पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मोजमापे घेऊन नव्याने २८ मीटरचे १२ गाळे उभारण्याचे सुमारे ३२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सादर केले. भुजबळ यांनी सदरचे अंदाजपत्रक मंत्रिमंडळ पायाभूत समितीकडे पाठविले. मंत्रिमंडळ पायाभूत समितीने हे अंदाजपत्रक नाकारले. दरम्यान, ठेकेदार सुप्रीम कंपनीने हातकणंगले पेठा विभागातील चौपदरीकरणाच्या कामातील वाढीव काम मंजूर होणार असे गृहीत धरून उड्डाण पुलाचे काम सुरू केले होते. रामराव इंगवले हायस्कूल ते हातकणंगले पंचायत समिती या टप्प्यात रस्त्यामध्ये पाईल मारून कॉलम उभारणी सुरू केली. मात्र, शासनाने मंजुरी नाकारल्यामुळे ठेकेदार कंपनीची पंचायत झाली आहे. त्यामुळे गेली दीड वर्षे हे काम रखडले आहे. (क्रमश:)भूसंपादन रखडलेमूळ अंदाजपत्रकातील २८ मीटरच्या एक गाळा माती भराव पुलाला स्थानिक नागरिकांचा विरोध. ४बांधकाम विभागाने नव्याने १२ गाळे असलेल्या ३३० मीटरच्या उड्डाणपुलाचे काम शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले. ४शासनाची मंजुरीची शक्यता गृहित धरून सुप्रीम कंपनीने अगोदरच उड्डाण पुलाचे काम सुरू केले.४अंदाजपत्रक मंत्रिमंडळ पायाभूत समितीने नव्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव नाकारला.४सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ सुप्रीम कंपनीला पुलाचे काम थांबविण्याचे आदेश दिले.४दरम्यान, कंपनीकडून पुलाचे कॉलम करून तयार झाले होते. ४बांधकाम विभागाकडून वाहतुकीस अडथळा होत असल्याने कॉलम कापून काढून टाकण्याचे आदेश४दीड वर्षे झाले तरी परिस्थिती जैसे थेच असल्याने कंपनीवर फौजदारी दाखल करण्याचे बांधकाम विभागाचे आदेश
हातकणंगलेतील पुलाचे ‘उड्डाण’ कधी?
By admin | Updated: November 21, 2015 00:49 IST