शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मटकाप्रकरणी बड्या धेंड्यांवर कारवाई कधी?

By admin | Updated: May 13, 2016 00:57 IST

इचलकरंजीचे पोलिस गप्प का? : नावे जाहीर, कोणतीच हालचाल नाही

इचलकरंजी : शहरात अवैध व्यवसाय जोरदारपणे सुरू असल्याचे दाखवून देत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई करून मटका व्यवसायातील बड्या बुकीचालकांची नावे जाहीर केली. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. एवढे होऊनही अद्याप नावे जाहीर झालेल्या बड्या प्रमुख मटकाचालकांवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुखांचा येथील पोलिसांवर वचक नसल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे.काही वर्षांपूर्वी अवैध व्यवसायातून वारेमाप पैसा मिळवून मोठे झालेल्या या बड्या धेंड्यांनी शहरात आपली दहशत निर्माण करीत गुन्हेगारी प्रस्थ वाढविले होते. या गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस दलात हालचाली होऊन या ठिकाणी आयपीएस अधिकारी एस. चैतन्य यांची नियुक्ती झाली. त्यांनी रुजू झालेल्या दिवसापासूनच कारवाईचा धडाका सुरू केला. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसही अवैध व्यवसायिकांना पाठीशी घालत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मानसिंग खोचे यांच्या नेतृत्वाखाली एक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) स्थापन केली.दोघांनी मिळून कारवाया करीत शहरात फोफावलेल्या या गुंडगिरीचा बीमोड केला. त्यानंतर बरेच दिवस शहरात निर्भयपणाचे वातावरण होते. दरम्यान, दोन्ही अधिकाऱ्यांच्या येथून बदल्या झाल्या. त्यानंतर पोलिस ठाण्यातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे हे अवैध व्यावसायिक पुन्हा डोके वर काढू लागले. शहरात सर्व काही आलबेल असल्याचे वरिष्ठांना भासवले जाऊ लागले. मात्र, सोमवारी रात्री कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने शहरातील वैरण बाजार, शाहू पुतळा, लिगाडे मळा, भोने माळ, मराठा चौक या ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे मारत सातजणांना अटक केली. यामध्ये नगरसेवक संजय तेलनाडे, मनीष अग्रवाल, राकेश अग्रवाल, वैजनाथ पाटील, आसिफमुल्ला, सुनील पवार, सुदर्शन बाबर यांचा बुकीमालक म्हणून समावेश आहे. तसेच या बुकीमालकांकडे प्रकाश ढेरे, सुनील गायकवाड, शीतल इजारे, संतोष कुपटे, बाळू कोरवी हे एजंट म्हणून काम करीत असल्याची माहितीही तपासांत समोर आली आहे. या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांनी पुढील कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, याबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. (वार्ताहर)कारवाईबाबत चर्चाचकारवाईबाबत जिल्हा पोलिसप्रमुखांचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे धोरण आहे का? यापुढील कारवाईबाबत निर्णय कोण घेणार? असे अनेक उलट-सुलट प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहेत.