शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर सत्तेचा काय फायदा?

By admin | Updated: January 1, 2015 00:01 IST

राजू शेट्टी : साखर आयुक्तांच्या दारात बसणार

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी कारखानदारांचा काँग्रेसच्या राजवटीत जसा व्यवहार होता तसाच तो राहणार असेल आणि राज्य सरकार नुसते बघ्याचीच भूमिका घेणार असेल, तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. आम्ही सत्तेत गेलो व सत्तेचा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार नसेल, तर अशी सत्ता काय कामाची, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी यासाठी साखर आयुक्तांच्या दारात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेट्टी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे आणि सहकार सचिव राजगोपाल देवरा यांच्याशी यंदाच्या ऊसदरप्रश्नी चर्चा झाली. आम्ही फार काळ वाट पाहू शकत नाही व सरकारनेही आमचा अंत पाहू नये, असा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. केंद्र सरकारने मदत करावी म्हणून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना यापूर्वीच निवेदन दिले आहे. ऊसदर मंडळाच्या बैठकीतही जे कारखाने एफआरपी एकरकमी देणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा निर्णय झाला आहे. कायद्यानुसार एफआरपी द्यावीच लागेल, असेही बैठकीत स्पष्ट केले होते, असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने वगळता अन्य जिल्ह्यांतील कारखाने सोयीनुसार व जमेल तेवढे पैसे शेतकऱ्यांना देऊ लागले आहेत. काही कारखान्यांनी दीड महिन्यांत शेतकऱ्यांना दमडीही दिलेली नाही. अशा स्थितीत सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज होती; परंतु सरकार वेळकाढू भूमिका घेणार असेल तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. सोलापुरात मोर्चा झाला. सांगलीत कालच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. आता आम्ही पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाच्या दारात जाऊन ठिय्या मारू. ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये, असे आमचे सरकारला सांगणे आहे.राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून, सहभागाविषयी विचारले असता शेट्टी म्हणाले, त्यासंदर्भातील चर्चा अजूनही मोघम स्वरूपात आहे. (प्रतिनिधी)