शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची हिंसेबाबत भूमिका काय?

By admin | Updated: March 25, 2015 00:41 IST

भारत पाटणकर : सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ, श्रमिक मुक्ती दलाची निर्धार सभा

कोल्हापूर : ‘राज्यात पुरोगामी नेत्यांचे एकापाठोपाठ खून होत आहेत, तसेच आणखी काही नेत्यांवर अशी वेळ येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे आवाहन श्रमिक क्रांती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी मंगळवारी येथे बोलताना केले.‘सनातन प्रभात’सारख्या वृत्तपत्रातून विखारी लिखाण करून समाजात तेढ निर्माण केली जात असताना मुख्यमंत्री त्यांना का जाब विचारत नाहीत, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला. येथील शाहू स्मारक भवनात सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आयोजित निर्धार सभेत डॉ. पाटणकर बोलत होते.राज्यातील नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांना मारले. आता आणखी काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊन मोर्चा काढायचे ठरविले तर त्याला बंदी घातली जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचा मोर्चा बंदी घालून रोखला; पण हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्यांना आणि धार्मिक नक्षलवादी बनण्याचे आवाहन करणाऱ्यांना ते जाब विचारू शकत नाहीत. फडणवीस यांचे हे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे डॉ. पाटणकर म्हणाले. विचारांची लढाई विचाराने व्हावी, अशी अपेक्षा असताना पाठीमागून येऊन गोळ्या झाडल्याने व्यक्तींचे विचार संपणार नाहीत, हे नथुरामवाद्यांनी लक्षात ठेवावे. जर युद्धच करायचे असेल तर समोर येऊन करा. आमचीही सांगून युद्ध करण्याची तयारी आहे. कष्टकरी, गरीब जनता त्यात कमी पडणार नाही; पण सरकारने ही वेळ जनतेवर आणू नये, असे आवाहन पाटणकर यांनी केले. जर सरकार दडपशाहीची भूमिका घेणार असेल तर आम्हाला नाठाळाच्या माथी काठी हाणण्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा मोहन अनपट यांनी दिला. नथुरामाची पिलावळ तुमच्यात असेल, पण आमची औलाद ही समोर येऊन लढण्याची आहे, असे अनपट म्हणाले. पाठीमागून वार करणारी अवसानघातकी प्रवृत्ती आपलं डोकं वर काढत आहे; त्यामुळे आपला आवाज बुलंद करण्याची आवश्यकता असल्याचे जयंत निकम यांनी सांगितले. कष्टकऱ्यांची चळवळ कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देऊ, असे देसाई म्हणाले. डॉ. प्रशांत पन्हाळकर, दिगंबर सकट, कुंदा निळकंठ यांची भाषणे झाली. अनिल म्हमाणे यांनी स्वागत केले. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)आता उठवू सारे रानसभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात चळवळींवर आधारित गाणी म्हटली गेली. डॉ. भारत पाटणकर यांनीही स्वत: साने गुरुजींनी लिहिलेले एक गाणे म्हटले, त्यांच्या सुरात संपूर्ण सभागृहानेही सूर मिसळला. ‘आता उठवू सारे रान.. आता फु लवू सारे रान, कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी.. कामकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण..आता उठवू सारे रान’ या पाटणकरांनी गायलेल्या गाण्याने सभागृहातील उपस्थितांचा उत्साह वाढविला. ंमाझी छाती ६५ इंचांचीसामाजिक चळवळ लढताना कोणी गोळी झाडली तर ती झेलण्यास माझी तयारी आहे. तुमची छाती ५६ इंचांची असली तर माझी छाती ही ६५ इंचांची असून ती गरीब, श्रमिक, कष्टकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. ती तुमच्या धमकीला घाबरणारी नाही, असे डॉ. पाटणकर म्हणाले.