शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलाने पन्नास वर्षांनी राजकारण करायचे काय?

By admin | Updated: February 20, 2017 01:00 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी यांच्याबद्दल नेहमीच आदर

वारणानगर : खासदार राजू शेट्टी हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. भाजपमुळे माझ्यात व खासदार राजू शेट्टी यांच्यात फूट पडेल असे जे बोलतात हे त्यांचे अज्ञान आहे. काळाच्या ओघात आमच्याबद्दलचा तो संभ्रम दूर होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच चळवळीत सक्रिय असलेल्या माझ्या मुलाने अजून पन्नास वर्षांनी निवडणूक लढवायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.वारणानगर येथे रविवारी जनसुराज्यचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वारणानगर येथे दुपारी विनय कोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत सदाभाऊ यांनी बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेला सुपुत्र सागर खोत यांच्या मागे सांगली जिल्ह्यातील जनसुराज्यची ताकद लावावी, अशी विनंती विनय कोरे यांना केल्याचे कळते. मात्र, तपशीलाबाबत गोपनीयता पाळत खोत यांनी भाजप-स्वाभिमानी-जनसुराज्य सत्तेतील मित्रपक्ष असल्याने कोरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले. खोत म्हणाले, खासदार राजू शेट्टी आमचे नेते असून, मी त्यांचा आदर करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची जाण आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून ‘स्वाभिमानी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडत आहे. सरकारही सकारात्मक आहे. त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेली अनेक वर्षे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीचे काम करीत आहे. माझा मुलगा सागर आता सव्वीस वर्षांचा आहे. मी आणखीन वीस-पंचवीस वर्षे राजकारण करीन. त्यानंतर म्हणजे ५० व्या वर्षी माझ्या मुलाने राजकारण करावे काय, असा सवाल त्यांनीकेला. माझ्यात व खासदार शेट्टी यांच्यात जे काही बोलले जात आहे ते काळाच्या ओघात दूर होईल. यापुढेही संघटनेशी एकनिष्ठ राहून चळवळीसाठी काम करण्याची ग्वाही खोत यांनी दिली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश युवकाध्यक्ष सुमित कदम, विश्वासराव जाधव आदी उपस्थित होते. भाजप प्रवेशाबद्दल योग्य वेळी बोलेन : खोतसदाभाऊ खोत हा सुज्ञ आहे. तो संघर्षातूनच निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघर्ष हा मला नवीन नाही. सध्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी बोलू, असे सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.सांगली जिल्ह्यातील ठिकठिकाणी मतदारसंघात भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, स्वाभिमानी व मित्रपक्षाला चांगले दिवस आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जास्त जागा जिंकून सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजप, स्वाभिमानी, मित्रपक्षाची सत्ता येणार असल्याची ग्वाहीही मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.