शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सांगरूळ परिसरात जल्लोषी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

सांगरूळ : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे सांगरूळ परिसरात उत्साहात जल्लोषी ...

सांगरूळ : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे सांगरूळ परिसरात उत्साहात जल्लोषी स्वागत करण्यात आले.

यावेळी गावाच्या वेशीपासून पारंपरिक वाद्यांत मिरवणूक काढण्यात आली. आमदार जयंत आसगावकर शनिवारी सायंकाळी सांगरूळमध्ये आले. गावाच्या वेशीपासून लेझीम, धनगरी ढोलांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील आबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केल्याने सारा गाव आनंदात न्हाऊन गेला हाेता. ठिकठिकाणी आमदार आसगावकर यांचे औक्षण करण्यात आले. बाजारपेठेत मिरवणूक आल्यानंतर आमदार आसगावकर यांनी सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ‌‌‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, विलास नाळे, एस. एम. नाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, राजेंद्र सूर्यवंशी, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, ‘कोजिमाशि’ पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास सुतार, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बालिंगे, कुडित्रे येथे जंगी स्वागत

आमदार आसगावकर शनिवारी सायंकाळी सांगरूळकडे जाताना वाटेत प्रत्येक गावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. बालिंगे येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, कुडित्रे येथे यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत केले.

फोटो ओळी : आमदार जयंत आसगावकर यांचे सांगरूळमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. (फोटो-०६१२२०२०-कोल-सांगरूळ)

- राजाराम लोंढे